मुंबई - इंग्लंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. याविषयावरून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता यामध्ये भारतीय संघाचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांची देखील भर पडली आहे. वाचा काय म्हणाले प्रसाद...
भारतीय संघाचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी, हार्दिक पांड्याला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी हार्दिक पांड्याला फक्त फलंदाज म्हणून संघात घेतले जाऊ शकत नाही, असे म्हटलं आहे.
प्रसाद यांनी सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत हार्दिक पांड्या एक फलंदाज म्हणून संघात जागा मिळवू शकत नाही. कारण संघात विहारी आणि इतर खेळाडूंच्या रुपाने मध्यक्रमात फलंदाज उपलब्ध आहेत.
दरम्यान, पांड्याने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात गोलंदाजी केली. त्यानंतर तो मार्चच्या अखेरीस इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. यानंतर पांड्याचा वापर एक फलंदाज म्हणूनच करण्यात आला. तो खूप दिवसांपासून गोलंदाजी करताना पाहायला मिळला नाही. पाठीवर झालेल्या सर्जरीनंतर ही बाब समोर आली.
पांड्याने आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना देखील गोलंदाजी केली नाही. विशेष म्हणजे या हंगामात पांड्या धावा करण्यात अपयशी ठरला. मागील वेळी जेव्हा भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. त्यात पांड्याने ५ गडी बाद केले होते. तेव्हा प्रसाद यांनी भारताला अशा अष्टपैलू खेळाडूची गरज असल्याचे सांगितलं होतं.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव.
लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर
राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जान नागवस्वाला
हेही वाचा - 'देशाअंतर्गत स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत होतो, पण प्रसिद्धी IPLमुळे मिळाली'
हेही वाचा - 'वजन कमी कर', टीम इंडियात पुनरागमनासाठी निवड समितीचा पृथ्वी शॉला सल्ला