ETV Bharat / sports

MCC Big Change: 'बॅट्समन' नाही आता 'बॅटर्स' शब्दाचा होणार वापर - mcc

एमसीसी आता क्रिकेट नियमात बॅट्समन ऐवजी बॅटर्स या शब्दाचा वापर करणार आहे. एमसीसीच्या एका समितीने या बदलावर शिक्कामोर्तब केले आहे.

mcc-announces-amendments-laws-cricket-use-gender-neutral-terms-batter-batters-rather-than-batsman
MCC Big Change: 'बॅट्समन' नाही आता 'बॅटर्स' शब्दाचा होणार वापर
author img

By

Published : Sep 22, 2021, 8:20 PM IST

लंडन - मेरीलेबोन क्रिकेट क्लबने क्रिकेट नियमात मोठा बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एमसीसी आता क्रिकेट नियमात बॅट्समन ऐवजी बॅटर्स या शब्दाचा वापर करणार आहे. एमसीसीच्या एका समितीने या बदलावर शिक्कामोर्तब केले आहे.

बॅट्समन ऐवजी बॅटर्स का?

एमसीसीचे म्हणणे आहे की, जेंडर न्यूट्रेलिटी शब्दाचा उपयोग सर्वांसाठी एक करण्यात आल्यास क्रिकेटची स्थिती आणखी सुधारण्यासाठी मदत मिळेल. हा बदल तात्काळ लागू करण्यात आला आहे आणि Lords.org/laws वर प्रकाशित क्रिकेट नियमात देखील याचे अपडेट करण्यात आले आहे. तसेच क्रिकेट अॅपच्या नियमांसोबत प्रिंटेड एडिशनमध्ये, पुढील अपडेटात बदल करण्यात येणार आहे.

जगामध्ये महिला क्रिकेटचा विकास वाढत आहे. प्रेक्षक महिला क्रिकेटला देखील पसंती देत आहे. टी-20 महिला विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला. यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी 17 हजार 116 प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली होती.

महिला फलंदाजासाठी इंग्रजीत बॅट्समन हा शब्द वापरला जातो. हा पूर्णत: चूकीचा शब्द आहे. यामुळे एमसीसीने बॅटर्स हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. एमसीसीने पुरूष आणि महिला क्रिकेटला लक्षात घेता फलंदाजाला आता इंग्रजीत बॅटर्स म्हणण्याचे ठरवले आहे. ज्या पद्धतीने बॉलर्स किंवा फिल्डर्स असे शब्दांचा वापर केला जातो. तशाच पद्धतीने बॅटर्स शब्दाचा प्रयोग नियमांमध्ये सामिल करण्यात आला आहे.

हेही वाचा - IPL 2021 : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला झाली शिक्षा, कारण...

हेही वाचा - DC Vs SRH : नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.