ETV Bharat / sports

Lucknow super giants vs Rajasthan : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 24 धावांनी केला पराभव, बोल्ट 'मॅन ऑफ द मॅच' - Rajasthan IPL match news

काल आयपीएल 2022 च्या 63 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (आरआर) लखनऊ सुपर जायंट्सवर (एलएसजी) जोरदार ( Lucknow super giants vs Rajasthan IPL match ) विजय मिळवला. हा सामना ब्रेबोर्न स्टेडियममध्ये खेळला गेला. ट्रेंट बोल्टच्या उत्कृष्ट गोलंदजीची राजस्थान रॉयल्सला विजय मिळवण्यात मदत झाली. ट्रेंट ने 18 चेंडूत 2 विकेट घेतल्या.

Lucknow super giants vs Rajasthan
राजस्थान रॉयल्स विजय आयपीएल
author img

By

Published : May 16, 2022, 7:53 AM IST

Updated : May 16, 2022, 7:58 AM IST

मुंबई - काल आयपीएल 2022 च्या 63 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (आरआर) लखनऊ सुपर जायंट्सवर (एलएसजी) जोरदार ( Lucknow super giants vs Rajasthan IPL match ) विजय मिळवला. हा सामना ब्रेबोर्न स्टेडियममध्ये खेळला गेला. ट्रेंट बोल्टच्या उत्कृष्ट गोलंदजीची राजस्थान रॉयल्सला विजय मिळवण्यात मदत झाली. ट्रेंट ने 18 चेंडूत 2 विकेट घेतल्या. सामन्यात चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच' निवडले गेले.

हेही वाचा - IPL 2022 RR vs LSG : नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; राजस्थानमध्ये दोन तर लखनौ संघात एक बदल

राजस्थान रॉयल्सने 20 षटकांमध्ये 6 गडी गमावून 178 धावा केल्या होत्या. हा लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली. संघातील डी कॉक आणि कर्णधार के.एल राहुलने सामन्याची सुरुवात केली. मात्र, डी कॉक रन बनवण्यात अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टने त्याच्या गोलंदाजीने डी कॉकला झेलबाद केले. यादरम्यान डी कॉक 8 चेंडूत केवळ 7 रन बनवू शकला. त्यानंतर आयुष बदौनी मैदानावर आला, मात्र तो देखील बोल्टच्या दुसऱ्या चेंडूत शुन्यावर एलबीडब्ल्यू आउट झाला. राहुल देखील अधिक रन बनवू शकला नाही, तो झेलबाद झाला. त्याने 19 चेंडूत केवळ 10 रन बनवले.

20 व्या षटकात लखनऊ संघाला 6 चेंडूत 34 धावांची आवश्यकता होती. मात्र, या षटकात स्टोनिस झेलबाद झाला. 20 षटकांत लखनऊ संघ 8 गडी गमावून केवळ 154 धावाच बनवू शकला. या विजयासह राजस्थानचा संघ 16 गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर, या पराभवासह लखनऊ संघ एका स्थानाने घसरला असून तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

हेही वाचा - IPL 2022 GT vs CSK : गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला सात विकेट्सने चारली धूळ

Last Updated : May 16, 2022, 7:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.