ETV Bharat / sports

मोहम्मद अझरुद्दीनकडे पुन्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद - hca presidents

लोकपाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) दीपक वर्मा यांनी रविवारी मोहम्मद अझरुद्दीनकडे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्षपद सोपवले आहे.

Lokpal-restores-Azharuddin-to-hca-presidents-post
मोहम्मद अझरुद्दीनकडे पुन्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद
author img

By

Published : Jul 5, 2021, 3:04 PM IST

Updated : Jul 5, 2021, 3:18 PM IST

मुंबई - भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला निलंबित करणार्‍या अ‍ॅपेक्स काऊन्सिलच्या पाच सदस्यांना तात्पुरते अपात्र ठरवत लोकपाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) दीपक वर्मा यांनी रविवारी अझरुद्दीनकडे पुन्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्षपद सोपवले आहे.

ही आहेत त्या पाच सदस्याची नावे -

जॉन मनोज, उपाध्यक्ष आर विजयनंद, नरेश शर्मा, सुरेंद्र अग्रवाल आणि अनुराधा ही या पाच सदस्यांची नावे आहेत. अ‍ॅपेक्स काऊन्सिलने आपल्या संविधानाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अझरुद्दीनचे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यपदावरून निलंबित केले होते.

अझरुद्दीन यांच्याविरूद्धची तक्रार लोकपालकडे पाठवण्यात आलेली नव्हती. अ‍ॅपेक्स कौन्सिल स्वतःहून असे निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच अध्यक्षाला निलंबित करण्यासाठी या पाच सदस्यांनी मंजूर केलेला ठराव रद्द करणे योग्य आहे. म्हणूनच मी निर्देश देतो, की मोहम्मद अझरुद्दीन अध्यक्षपदावर राहिले पाहिजेत आणि पदाधिकाऱ्यांविरोधातील सर्व तक्रारी लोकपालच ठरवतील, असे न्यायमूर्ती वर्मा यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण -

टी-१० स्पर्धेत भाग घेणार्‍या दुबई स्थित खासगी क्रिकेट क्लबचा सदस्य असल्याचा आणि असोसिएशनला याबाबत न सांगण्याचा आरोप अझरुद्दीनवर लावण्यात आला होता. बीसीसीआयने या स्पर्धेला मान्यता दिलेली नाही. या कारणाने अझहरुद्दीन यांचे निलंबन करण्यात आले होते.

दरम्यान, अझरुद्दीनने भारताकडून ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावे ९ हजाराहून अधिक धावा आहेत.

हेही वाचा - BCCI ने शेअर केला स्मृती मंधानाचा ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ

हेही वाचा - सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनल्यानंतर कसे वाटत आहे? मिताली राजचे ३ शब्दात उत्तर

Last Updated : Jul 5, 2021, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.