ETV Bharat / sports

KKR Vs GT : आंद्रे रसेलची खेळी व्यर्थ; गुजरातचा 8 धावांनी विजय - आंद्रे रसेल मराठी बातमी

आयपीएल 2022 मधील 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( KKR Vs GT ) यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरातने कोलकातावर 8 धावांनी मात केली ( Gujarat Titans Beat Kolkata Knight Riders ) आहे.

KKR Vs GT
KKR Vs GT
author img

By

Published : Apr 23, 2022, 9:16 PM IST

मुंबई - आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मधील 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( KKR Vs GT ) यांच्यात पार पडला. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने कोलकातावर 8 धावांनी मात केली आहे. हार्दिक पंड्याच्या जोरावर गुजरातने कोलकातासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानतंर कोलकाताने 20 षटकात 148 धावा ठोकत चौथ्या पराभवाचा सामना करावा ( Gujarat Titans Beat Kolkata Knight Riders ) लागला.

नाणेफेक जिंकत गुजरातने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना हार्दिकने ( Hardik Pandya ) सर्वाधिक धावा केल्या. हार्दिकने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 49 चेंडूत 67 धावा करत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर डेविड मिलरने ( 27 ), वृद्धिमान साहाने ( 25 ), राहुल तेवतियाने ( 17 ), शुभमन गिलने ( 7 ), अल्जारी जोसेफ ( 1 ) धावांची पारी खेळली.

यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने 1 षटकात 5 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त साऊदीने 3, उमेश यादव आणि शिवम मावी यांनीही 1 विकेट घेतली.

आंद्रे रसेलची खेळी व्यर्थ ( Andre Russell ) - गुजरातने दिलेल्या आवाहनांचा पाठलाग करताना आंद्रे रसेलने अष्टपैलू खेळी केली. त्याने 6 षटकार 1 चौकारासह 25 चेंडूत 48 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त रिंकू सिंगने ( 35 ), वेंकटेश अय्यर ( 17 ), उमेश यादव ( 15 ), श्रेयस अय्यर ( 12), नितीश राणा ( 2 ), टीम साउथी ( 1 ) अशा धावा ठोकल्या. दोन खेळाडू सोडले तर एकहीनेही 20 धावांच्या वर मजल मारली नाही.

गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर, अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

हेही वाचा - No Ball Controversy : 'नोबॉल' प्रकरण नडले; दिल्ली संघातील 'या' तिघांवर आयपीएलकडून कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.