नॉटिंगहॅम: आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज जो रूटने ( England batsman Joe Root ) पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सलग दोन सामन्यांत दोन शतके झळकावणारा जो रूट पुन्हा कसोटी क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे. जो रूटने ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्नस लॅबुशेनला मागे टाकत पुन्हा नंबर वनची खुर्ची मिळवली ( Joe Root tops the ICC Test rankings ) आहे. जो रुट हा यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होता आणि तो बराच काळ अव्वल 10 मध्ये राहिला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात जो रूटने शतक झळकावले. या जोरावर तो आधी दुसरा आणि नंतर पहिले स्थान पटकावले आहे. जो रूटच्या खात्यात सध्या 897 रेटिंग पॉईंट्स आहेत, तर मार्नस लाबुशेनच्या खात्यात 892 गुण ( Marnus Labuschen 892 points ) आहेत. तिसर्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ आहे, त्याच्या खात्यात 845 गुण आहेत. बाबर आझम 815 गुणांसह चौथ्या आणि केन विल्यमसन 798 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
-
🔹Joe Root reclaims No.1 spot 🥇
— ICC (@ICC) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🔹Trent Boult bursts into top 10 🔥
Plenty of movement in the @MRFWorldwide ICC Test Player Rankings after the second #ENGvNZ match 👉 https://t.co/J6m5cEKRSA pic.twitter.com/CqV1mlBMmF
">🔹Joe Root reclaims No.1 spot 🥇
— ICC (@ICC) June 15, 2022
🔹Trent Boult bursts into top 10 🔥
Plenty of movement in the @MRFWorldwide ICC Test Player Rankings after the second #ENGvNZ match 👉 https://t.co/J6m5cEKRSA pic.twitter.com/CqV1mlBMmF🔹Joe Root reclaims No.1 spot 🥇
— ICC (@ICC) June 15, 2022
🔹Trent Boult bursts into top 10 🔥
Plenty of movement in the @MRFWorldwide ICC Test Player Rankings after the second #ENGvNZ match 👉 https://t.co/J6m5cEKRSA pic.twitter.com/CqV1mlBMmF
आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर पॅट कमिन्स 901 गुणांसह ( Pat Cummins 901 points ) पहिल्या क्रमांकावर आहे, तर आर अश्विन 850 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह 830 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खालोखाल शाहीन आफ्रिदीच्या खात्यात 827 गुण आहेत आणि कागिसो रबाडा 818 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
तसेच अष्टपैलूच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा 385 गुणांसह पहिल्या ( Ravindra Jadeja tops all-rounders Test rankings ) स्थानी आहे. त्याचबरोबर 341 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आर आश्विन आहे. तिसऱ्या क्रमांकावर जेसन होल्डर असून त्याच्या खात्यात 336 गुण आहेत आणि शाकिब अल हसन 327 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आहे, त्याच्या खात्यात 307 गुण आहेत.
हेही वाचा - USTA रशियन, बेलारशियन खेळाडूंना 2022 च्या US ओपनमध्ये स्वतंत्रपणे स्पर्धेत सहभागाची परवानगी