नवी दिल्ली : भारताच्या यंगिस्तानने अंतिम सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवत पाचव्यांदा अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप वर आपले नाव कोरले ( India Win Under 19 World Cup ) आहे. त्यांच्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत मोठी घोषणा केली आहे.
जय शाह यांनी ट्विट करत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, "वर्ल्डकप विजेत्या प्रत्येक खेळाडूला 40 लाख आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्याला 25 लाखाचे बक्षीस जाहीर करताना मला आनंद आहे. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे," असेही जय शाह यांनी ( Jay Shah Announced 40 Lakh ) म्हटलं.
-
I’m pleased to announce the reward of 40 lacs per player and 25 lacs per support staff for the U19 #TeamIndia contingent for their exemplary performance in #U19CWCFinal. You have made 🇮🇳 proud. @SGanguly99 @ThakurArunS @ShuklaRajiv
— Jay Shah (@JayShah) February 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I’m pleased to announce the reward of 40 lacs per player and 25 lacs per support staff for the U19 #TeamIndia contingent for their exemplary performance in #U19CWCFinal. You have made 🇮🇳 proud. @SGanguly99 @ThakurArunS @ShuklaRajiv
— Jay Shah (@JayShah) February 5, 2022I’m pleased to announce the reward of 40 lacs per player and 25 lacs per support staff for the U19 #TeamIndia contingent for their exemplary performance in #U19CWCFinal. You have made 🇮🇳 proud. @SGanguly99 @ThakurArunS @ShuklaRajiv
— Jay Shah (@JayShah) February 5, 2022
असा रंगला सामना
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी 189 धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय संघाने हे लक्ष 47.4 षटकांत पूर्ण केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत तंबूत गेला. इंग्लंडकडून जेम्स रियूने 95 धावांची झुंज दिली. तर, भारताकडून बावाने 5 विकेट्स घेत इंग्लंडच्या गडाला सुरुंग लावला. त्यासाठी राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला.