लंडन: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ( England fast bowler James Anderson ) निवडीसाठी स्वतःला तंदुरुस्त घोषित केले आहे. कारण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) न्यूझीलंडविरुद्ध 2 जूनपासून लॉर्ड्स येथे सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यासाठी तयार आहे. अॅशेस मोहिमेदरम्यान चांगली कामगिरी करूनही 39 वर्षीय अँडरसनला कॅरेबियन दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वगळण्यात आले होते.
परंतु नवे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम ( New coach Brendan McCullum ) आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्या रूपाने इंग्लंडला नवा कर्णधार मिळाला, त्यामुळे पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी अँडरसनचे कसोटी संघात पुनरागमन होण्याची शक्यता वाढली आहे. क्रिकेटच्या इतिहासात अँडरसनपेक्षा जास्त कसोटी विकेट्स कोणत्याही वेगवान गोलंदाजाला मिळालेल्या घेता आलेल्या नाहीत. मात्र अनुभवी गोलंदाजाने संघ जाहीर होण्यापूर्वीच स्वत:ला तंदुरुस्त घोषित केले आहे.
अँडरसनने स्काय स्पोर्ट्सला सांगितले ( Anderson told Sky Sports ) की, “माझ्याकडे भूतकाळातील किती विकेट्स आहेत हे मला बघायचे नाही. मला फक्त पुढे बघायचे आहे की, मी चांगली गोलंदाजी करतोय. विकेट्स घेतोय आणि चांगल्या फॉर्ममध्ये. या वर्षी मी लँकेशायरच्या मोसमाची चांगली सुरुवात करण्यासाठी आणि त्यासाठी तयारी करण्यास उत्सुक होतो. तो पुढे म्हणाला, मी चांगल्या फॉर्ममध्ये गोलंदाजी करत आहे. त्यामुळे ज्याप्रकारे घडामोडी घडत आहेत त्यावर मी आनंदी आहे आणि संघात परत आल्यास मला खूप आनंद होईल.
अँडरसनच्या पुनरागमनामुळे गेल्या 12 महिन्यांत केवळ एक कसोटी विजयासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ( World Test Championship ) टेबलमध्ये तळाशी असलेल्या संघाचे नशीब बदलू शकते. अँडरसनने गेल्या महिन्यात लँकेशायरकडून खेळलेल्या तीन काऊंटी सामन्यांमध्ये 19.54 च्या सरासरीने 11 बळी घेत चांगली कामगिरी केली आहे. लँकेशायरच्या यॉर्कशायरविरुद्ध अनिर्णित झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी अँडरसनने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटला बाद केले होते.
हेही वाचा -IPL 2022 Updates : केकेआरला मोठा धक्का; अजिंक्य रहाणे आयपीएल स्पर्धेतून बाहेर