नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 स्पर्धेतील अंतिम ( T20 World Cup 2022 is Going to Reach its End ) सामन्यात भारताने रविवारी झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव ( India and Pakistan have Reached The Semi Finals ) केला. त्यानंतर उपांत्य फेरीत भारताची कोणाबरोबर लढत होणार हे निश्चित झाले आहे. भारताच्या सामन्यासोबतच T20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चार संघही निश्चित झाले ( England and New Zealand have Reached Semi Finals ) आहेत. ( Final Match will be Played on 13 November at Melbourne ) दुसऱ्या गटातून भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरी ( India and Pakistan have Reached Semi Finals ) गाठली आहे. पहिल्या गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंड सोबत होणार आहे, तर पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
उपांत्य फेरीतील सामन्यावर सगळ्यांचे लक्ष्य : पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ९ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा संघ भारताशी भिडणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबरला अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.
उपांत्य फेरीतील फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष राहील : भारताचा विराट कोहली सध्याच्या T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 123.00 च्या सरासरीने 246 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 193.96 च्या स्ट्राइक रेटने 225 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आणि पाकिस्तानचा शान मसूद (१३४ धावा) यांनीही चांगली कामगिरी केली आहे. फिलिप्सने ग्रुप स्टेजमध्ये शतक झळकावले आहे. इंग्लंडचा अॅलेक्स हेल्सही चांगला खेळ करत आहे.
-
Virat Kohli has been back to his best in piling on the most runs at the #T20WorldCup 🚀
— ICC (@ICC) November 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Highlights of the India star's unbeaten knock against Bangladesh 👉 https://t.co/7rENKucRYd pic.twitter.com/i0nbQADCyO
">Virat Kohli has been back to his best in piling on the most runs at the #T20WorldCup 🚀
— ICC (@ICC) November 7, 2022
Highlights of the India star's unbeaten knock against Bangladesh 👉 https://t.co/7rENKucRYd pic.twitter.com/i0nbQADCyOVirat Kohli has been back to his best in piling on the most runs at the #T20WorldCup 🚀
— ICC (@ICC) November 7, 2022
Highlights of the India star's unbeaten knock against Bangladesh 👉 https://t.co/7rENKucRYd pic.twitter.com/i0nbQADCyO
सॅम करण, अर्शदीप सिंग गोलंदाजीत चमत्कार करू शकतात : इंग्लंडचा सॅम कुरन, भारताचा अर्शदीप सिंग आणि पाकिस्तानचा शादाब खान यांनी आतापर्यंत 10-10 बळी घेतले आहेत. वेगवान गोलंदाज मार्क वुडनेही यश मिळवले आहे. त्याने चार सामन्यांत 12.00 च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या आहेत. किवी फिरकीपटू मिचेल सँटनरने आतापर्यंत 6.43 च्या इकॉनॉमी रेटने आठ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर भारताच्या भुवनेश्वर कुमार, हरिस रौफ, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील.
-
Wanindu Hasaranga is on track to go back-to-back for most wickets at the #T20WorldCup 👊
— ICC (@ICC) November 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Best of the Sri Lanka maestro ➡️ https://t.co/RWvjszBEO2 pic.twitter.com/nxYrbsce7w
">Wanindu Hasaranga is on track to go back-to-back for most wickets at the #T20WorldCup 👊
— ICC (@ICC) November 6, 2022
Best of the Sri Lanka maestro ➡️ https://t.co/RWvjszBEO2 pic.twitter.com/nxYrbsce7wWanindu Hasaranga is on track to go back-to-back for most wickets at the #T20WorldCup 👊
— ICC (@ICC) November 6, 2022
Best of the Sri Lanka maestro ➡️ https://t.co/RWvjszBEO2 pic.twitter.com/nxYrbsce7w
चारही संघांचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास :
न्यूझीलंड : न्यूझीलंडने गट १ मधून अव्वल स्थान मिळवले. किवी संघाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि आयर्लंडविरुद्ध विजय नोंदवले तर इंग्लंडविरुद्ध पराभूत झाले. याशिवाय न्यूझीलंडचा एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.
इंग्लंड : गट-1 मध्ये इंग्लंडने अफगाणिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय नोंदवला तर आयर्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. याशिवाय इंग्लिश संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
भारत : गट-2 मध्ये भारताने अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने सुपर-12 मध्ये पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड आणि झिम्बाब्वे यांचा पराभव केला तर त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
पाकिस्तान : गट-2 मध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला. याशिवाय भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.