ETV Bharat / sports

IPL 2023 : संजू सॅमसनची आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी, हा विक्रम मोडणे जाणार कठीण - Sanju Samson IPL Record

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. यातील एक विक्रम असा आहे की तो मोडणे इतर खेळाडूंना कठीण जाणार आहे.

Sanju Samson
संजू सॅमसन
author img

By

Published : Apr 15, 2023, 1:50 PM IST

कोलकाता: आयपीएल सामन्यात हॅरी ब्रूकने धमाकेदार कामगिरी केली आहे. आयपीएल 2023 मध्ये हैदराबाद सनरायझर्स संघासाठी हॅरी ब्रूकने 55 चेंडूत 100 धावांची खेळी करून क्षमता सिद्ध केली आहे या खेळीदरम्यान हॅरी ब्रूकने 12 चौकार आणि 3 षटकार मारून गोलदाजांची धुलाई केली आहे. त्याचबरोबर पहिल्या विकेटपासून सहाव्या विकेटपर्यंत प्रत्येक खेळाडूसोबत छोट्या-मोठ्या भागीदारी करत संघासाठी मोठे योगदान केले आहे. हॅरी ब्रूकने मयंक अग्रवालसोबत पहिल्या विकेटसाठी 25 चेंडूत 46 धावा, तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार एडन मार्करामसह 47 चेंडूत 72 धावा आणि अभिषेक शर्मासोबत 33 चेंडूत 72 धावा करत सनरायझर्स हैदराबादचा २०० टप्पा ओलांडला.

विदेशी खेळाडूंची व भारतीय खेळाडूंची आयपीएलमधील कामगिरी

सर्व आयपीएल सीझनमध्ये पहिले शतक कोणी झळकावले आहे. हॅरी ब्रूक्सने या आयपीएल हंगामातील पहिले शतक झळकावताच आयपीएलच्या प्रत्येक हंगामात कोणत्या खेळाडूंनी पहिले शतक झळकावले आणि त्यात किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल 2008 पासून सुरू झालेल्या आयपीएल सीझनपासून आतापर्यंतच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर आयपीएलच्या एकूण 16 सीझनपैकी विदेशी खेळाडूंनी 9 सीझनमध्ये शतक झळकावले आहे. तर भारतीय खेळाडूंनी केवळ 7 सीझनमध्ये पहिले शतक झळकावले आहे. या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन पहिल्या क्रमांकावर आहे.

पहिले शतक ठोकणारे खेळाडू
पहिले शतक ठोकणारे खेळाडू

हे आहेत शतकवीर: ब्रेंडन मॅक्युलम, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन, लेंडल सिमन्स, क्विंटन डिकॉक आणि ख्रिस गेल, जोस बटलर, हॅरी ब्रूक व्यतिरिक्त आयपीएल हंगामातील पहिले शतक झळकावणाऱ्या विदेशी खेळाडूंमध्ये आहेत. 8 खेळाडूंनी मिळून 9 शतके झळकावली आहेत. तर ब्रेंडन मॅक्युलमने हा पराक्रम दोनदा केला आहे. दुसरीकडे, भारतीय खेळाडूंमध्ये युसूफ पठाण, पॉल वलथाटी, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. यापैकी संजू सॅमसनने तीन सिझनमध्ये आपल्या बॅटने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले आहे. संजू सॅमसनने 2017, 2019 आणि 2021 मध्ये आपल्या बॅटने मोसमातील पहिले शतक झळकावले आहे, अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे.

हेही वाचा-IPL 2023 : सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सला चारली पराभवाची धूळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.