अहमदाबाद (गुजरात) - काल पंजाब आणि बंगळुरू संघात आयपीएलचा सामना झाला होता. यात पंजाब संघाला विजय मिळाला आहे. पंजाबने बंगळुरूवर ३४ धावांनी विजय मिळवला.
हेही वाचा - DC vs KKR : दिल्लीचा कोलकातावर सहज विजय, पृथ्वी शॉची तुफानी खेळी
पंजाबने आधी फलंदाजीला उतरूण बंगळुरू समोर १८० धावांचे आवाहन ठेवले. पंजाबने ५ गडी गमवून १७९ धावा केल्या होत्या. मात्र, बंगळुरू संघ फक्त १४५ धावा करू शकला. लक्ष गाठताना बंगळुरू संघाने ८ गडी गमावले. पंजाबच्या हरप्रित ब्रारने चांगली कामगिरी केल्याने त्याला सामानावीरचा पुरस्कार देण्यात आला. काल मिळालेल्या विजयाने पंजाबचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा - IPL इतिहासात पहिल्यादांच घडलं, ३ सामन्यात घडलेला अजब योगायोग जाणून घ्या