मोहाली (पंजाब) : इंडियन प्रीमियर लीगच्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. हा सामना मोहाली स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. सुरुवातीला आरसीबीने फलंदाजी करत पंजाबसमोर 175 धावांचे मोठे टार्गेट ठेवले होते. आरसीबीच्या सुरुवातीच्या फलंदाचांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, पंजाबच्या विकेट्स लवकर पडत गेल्याने, 150 धावांपर्यंतच त्यांचा संर्व संघ तंबूत परत गेला होता. त्यामुळे आरसीबीने 24 धावांनी हा सामना खिशात घातला आहे. होम ग्राऊंडवर पंजाबचा पराभव झाला आहे.
दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर - दोन्ही संघांनी आतापर्यंत पाच-पाच सामने खेळले आहेत, ज्यात पंजाबच्या संघाने तीन जिंकले आहेत, तर दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर नजर टाकली तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या 5 सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि केवळ दोन सामने जिंकता आले आहेत.
दोन्ही संघ तगडे - मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चेन्नई सुपर किंग्जकडून 8 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मागील सामन्यात पंजाबने लखनौचा पराभव केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब हे दोन्ही संघ सध्या फॉर्मध्ये असल्याचे त्यांच्या खेळीतून दिसून येत आहे.
दोन्ही संघांचे टेबल पॉईंट - पंजाबचा संघ पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स संघ आठव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नसल्याचे मागील काही सामन्यांमधून दिसून आले आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ केवळ आघाडीच्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करूनही सामना जिंकण्यात अपयशी ठरत आहे. त्याचबरोबर पंजाबचे फलंदाजही आपल्या आघाडीच्या फलंदाजीवर अवलंबून आहेत, पण लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या शेवटच्या फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला होता.
हेही वाचा - KL Rahul Fined : लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 12 लाखांचा दंड