नवी दिल्ली : T20 विश्वचषकाचा ( First Semi Final of T20 World Cup 2022 ) पहिला उपांत्य सामना केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड आणि बाबर ( First Semi Final in PAK vs NZ ) आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान (PAK vs NZ) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ बुधवारी (९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर आमने-सामने येतील. हे दोन संघ विश्वचषकाच्या ( PAK and NZ Thrice in Semi Finals of World Cup 2022 ) उपांत्य फेरीत (ODI आणि T20) तीनदा आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने तिन्ही वेळा विजय मिळवला आहे.
-
𝐂𝐨𝐧𝐟𝐢𝐫𝐦𝐞𝐝
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Pakistan 🆚 New Zealand
Semi-final at the SCG! 🏏#WeHaveWeWill | #T20WorldCup pic.twitter.com/8Xqs6Qwvaf
">𝐂𝐨𝐧𝐟𝐢𝐫𝐦𝐞𝐝
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 6, 2022
Pakistan 🆚 New Zealand
Semi-final at the SCG! 🏏#WeHaveWeWill | #T20WorldCup pic.twitter.com/8Xqs6Qwvaf𝐂𝐨𝐧𝐟𝐢𝐫𝐦𝐞𝐝
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 6, 2022
Pakistan 🆚 New Zealand
Semi-final at the SCG! 🏏#WeHaveWeWill | #T20WorldCup pic.twitter.com/8Xqs6Qwvaf
वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड-पाकिस्तान : एकदिवसीय विश्वचषक १९९२ च्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा प्रथमच पराभव केला होता. यानंतर 1999 च्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा संघ दुसऱ्यांदा न्यूझीलंडशी भिडला. यावेळीही किवी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी, 2007 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ तिसऱ्यांदा आमने-सामने आला होता. या वेळीही पाकिस्तान संघ विजयी ठरला. अशाप्रकारे टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत किवी संघ पाकिस्तानला पराभूत करू शकला नाही.
आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड झालेले सामने : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड 28 टी-20 सामने न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळले गेले आहेत. याबाबतीत पाकिस्तानचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. 17 वेळा पाकिस्तानने बाजी मारली आहे, तर 11 वेळा न्यूझीलंडने सामना जिंकला आहे. यामध्ये पाक्सि
सामन्यापूर्वी हवामानाचा अंदाज : सामन्याच्या दिवशी आकाश निरभ्र असेल, ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत हवामान खात्यानुसार बुधवारी सिडनीमध्ये आकाश निरभ्र असेल. तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. २० टक्के पाऊस अपेक्षित आहे. अशा स्थितीत पावसामुळे सामन्यावर परिणाम होण्याची अपेक्षा नाही. सिडनी वेळेनुसार, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला उपांत्य सामना संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल. AQ Weather च्या अहवालानुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाही.
दोन्ही संघ : न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे (डब्ल्यूके), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर , ईश सोधी , टिम साउथी.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, मोहम्मद हॅरिस.