ETV Bharat / sports

MS Dhoni With SRH Team : माहीने दिल्या हैदराबादच्या युवा खेळाडूंना टिप्स, पहा व्हिडिओ - महेंद्रसिंह धोनी हैदराबादच्या युवा खेळाडूंसोबत

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या संघासोबतच इतर संघांमधील खेळाडूंमध्येही खूप लोकप्रिय आहे. विरोधी संघातील खेळाडूंसोबत आपले अनुभव शेअर करण्यासोबतच आवश्यकतेनुसार तो त्यांना टिप्सही देतो. काल सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने हैदराबादच्या युवा खेळाडूंशी संवाद साधला.

MS Dhoni With SRH Team
महेंद्रसिंह धोनी हैदराबादच्या युवा खेळाडूंसोबत
author img

By

Published : Apr 22, 2023, 3:25 PM IST

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. याची प्रचिती तुम्ही ही काही छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहून घेऊ शकता. काल धोनीच्या चेन्नईचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होता. या सामन्यानंतर धोनीने सनरायझर्स हैदराबादच्या टीम आणि खेळाडूंसोबत क्लिक केलेले काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार, खेळाडू आणि टीम मेंबर्ससोबत दिसत आहे.

धोनीने नटराजनच्या मुलीशी संवाद साधला : पहिला व्हिडिओ सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज नटराजनच्या कुटुंबासोबतचा आहे. यामध्ये तो सामन्यापूर्वी नटराजन याच्या मुलीसोबत इंग्रजी भाषेत काही संभाषण करण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान महेंद्रसिंग धोनी नटराजन याच्या चिमुरडीशी बोलत असताना त्याच्या मुलीबद्दलची माहिती शेअर करतो आहे. मुलीला इंग्रजी भाषेत त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसली तरीही तो हातवारे करून तिला आपल्या मुलीबद्दल सांगत आहे. या संपूर्ण संवादानंतर महेंद्रसिंग धोनीने नटराजन याच्या कुटुंबियांसोबतही एक फोटो क्लिक केला.

युवा खेळाडूंना टिप्स दिल्या : या सोबतच महेंद्रसिंह धोनीचा सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तो सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधाराकडे इशारा करत काहीतरी दाखवत आहे. या फोटोवर लोक सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या सोबतच त्याने सनरायझर्स हैदराबादच्या इतर खेळाडूंशीही संवाद साधला. धोनी युवा खेळाडूंना काही आवश्यक टिप्स देताना दिसतो आहे. धोनीचा विरुद्ध संघातील खेळाडूंसोबतचा व्हिडिओ पाहून अंदाज येऊ शकतो की तो कोणत्याही संघात खेळत असला तरी इतर संघातील खेळाडूही त्याच्याकडून काही टिप्स आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करतात.

धोनीचे निवृत्तीचे संकेत : चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेटने पराभव केला. या दरम्यान, प्रश्नांची उत्तरे देताना महेंद्रसिंग धोनीने तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अंतिम टप्यात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : IPL 2023 : डेव्हिड वॉर्नरचा पुष्पा अवतार सोशल मीडियावर व्हायरल! फॅन्स म्हणाले, हा तर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.