ETV Bharat / sports

आयपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी हैदराबाद तयार - अझरुद्दीन - मोहम्मद अझरुद्दीन लेटेस्ट न्यूज

अझरुद्दीन म्हणाला, ''मी केटी रामारावांच्या आवाहनाचे जोरदार समर्थन करतो. बीसीसीआयच्या निर्देशानुसार हैदराबाद आयपीएल आयोजित करण्यात आणि जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. ''

Mohammed Azharuddin on ipl
Mohammed Azharuddin on ipl
author img

By

Published : Mar 1, 2021, 5:40 PM IST

हैदराबाद - आयपीएल २०२१ हंगामासाठी आयोजन ठिकाणाच्या यादीत हैदराबादचा देखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी तेलंगाना राष्ट्र समिती (टीआरएस) चे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी केली होती. आता भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही या मागणीबाबत जोर धरला आहे. के. टी. रामाराव यांनी एक ट्विट करत बीसीसीआय आणि आयपीएलच्या पदाधिकाऱ्यांना अपील केले होते.

अझरुद्दीन म्हणाला, ''मी केटी रामारावांच्या आवाहनाचे जोरदार समर्थन करतो. बीसीसीआयच्या निर्देशानुसार हैदराबाद आयपीएल आयोजित करण्यात आणि जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. ''

दरम्यान, बीसीसीआयने आयपीएल २०२१ साठी आयोजन ठिकाणासाठी ६ शहरांची नावे शार्टलिस्ट केली आहेत. यात मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू आणि दिल्लीचे नाव आहे. या यादीत हैदराबादचे नाव नाही. यामुळे रामाराव यांनी या संदर्भात ट्विट करत अपील केले होते.

मुंबईत खेळले जाणारे सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होतील. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा - बजरंग पुनियाचा सोशल मीडियाला 'रामराम'!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.