ETV Bharat / sports

IPL 2023 : गुजरातचा राजस्थानवर 9 गडी राखून दणदणीत विजय - गुजरात टायटन्स

राजस्थानने दिलेले 119 धावांचे लक्ष गुजरातने 13.5 षटकांत केवळ 1 गडी गमावून गाठले. गुजरातकडून सलामीवीर ऋद्धिमान साहाने 34 चेंडूत सर्वाधिक 41 धावांचे योगदान दिले. तर राजस्थानकडून युझवेंद्र चहलने एकमेव विकेट घेतली.

Rajasthan Royals vs Gujarat Titans
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
author img

By

Published : May 5, 2023, 7:44 PM IST

Updated : May 5, 2023, 10:35 PM IST

जयपूर : आयपीएल 2023 मधील 48 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्ससमोर गुजरात टायटन्सचे आव्हान होते. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरातचे 9 सामन्यात 6 विजयासह 12 गुण झाले असून गुजरातचा संघ गुणतालीकेत अव्वल स्थानी आहे. राजस्थानची चौथ्या स्थानी घसरण झाली असून त्यांचे 9 सामन्यात 10 गुण आहेत.

हार्दिक पंड्याची धुवांधार खेळी : राजस्थानने दिलेल्या 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. ऋद्धिमान साहाने 34 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. तर शुभमन गिलने 35 चेंडूत 36 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने 15 चेंडूत धुवांधार 39 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने एकमेव विकेट घेतली.

संजू सॅमसनची एकाकी झुंझ : तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 17.5 षटकांत सर्वबाद 118 धावा केल्या. संजू सॅमसन वगळता राजस्थानचा एकही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. सॅमसनने 20 चेंडूत 30 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने घातक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 14 धावा देत 3 विकेट घेतल्या.

गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल ; इम्पॅक्ट प्लेअर - शुभमन गिल, साई सुदर्शन, श्रीकर भरत, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग 11) : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल ; इम्पॅक्ट प्लेअर - मुरुगन अश्विन, जो रूट, रियान पराग, कुलदीप यादव, के.एम. आसिफ

संजू सॅमसन : आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. ही खेळपट्टी जाणून घेणे थोडे कठीण आहे. आम्ही काही षटके फलंदाजी करू आणि नंतर समजून घेऊ. (स्मित). आम्ही खेळत असलेल्या क्रिकेटचा दर्जा खरोखर चांगला आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून जयस्वाल जी तयारी करत होता, त्याच्याकडून आम्हाला अशाच खेळीची अपेक्षा होती. संघात एक बदल आहे. जेसन होल्डरच्या जागी अ‍ॅडम झम्पा संघात येतो आहे.

हार्दिक पंड्या : आम्हीही प्रथम फलंदाजी करणार होतो. यजमान संघाच्या कर्णधाराला काय निवडायचे हे माहित नव्हते, मलाही वाटले की गोलंदाजी करून काय होते ते पाहू. त्यांचा संघ मजबूत आणि सुसंगत आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम देणे आवश्यक आहे. आमच्या संघात एकही बदल नाही.

हे ही वाचा : Robin Uthappa praised Yashasvi Jaiswal : शानदार शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल भारतीय क्रिकेटच्या पुढील सुपरस्टारपैकी एक - रॉबिन उथप्पा

Last Updated : May 5, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.