ETV Bharat / sports

IPL 2023 : मुंबईचा हैदराबादवर 8 गडी राखून विजय, कॅमेरून ग्रीनने ठोकले टी-20 मधील पहिले शतक - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

आजच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आहे. हैदराबादने मुंबईला विजयासाठी 201 धावांचे लक्ष दिले होते. मुंबईने हे लक्ष 18 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने 47 चेंडूत नाबाद 100 धावा करत टी-20 मधील आपले पहिले शतक साजरे केले.

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
author img

By

Published : May 21, 2023, 3:30 PM IST

Updated : May 21, 2023, 7:31 PM IST

मुंबई : आयपीएल 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 200-5 धावा केल्या. प्रत्युतरात मुंबईने हे लक्ष 18 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात गाठले.

  • 𝗠𝗔𝗜𝗗𝗘𝗡 𝗜𝗣𝗟 𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗬 𝗳𝗼𝗿 𝗖𝗮𝗺𝗲𝗿𝗼𝗻 𝗚𝗿𝗲𝗲𝗻!

    A sensational HUNDRED that in the chase 🔥🔥#TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/exw1FXun7a

    — IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कॅमेरून ग्रीनचे शतक : मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने 47 चेंडूत नाबाद 100 धावा करत टी-20 मधील आपले पहिले शतक ठोकले. आपल्या या खेळीत त्याने 8 चौकार आणि 8 षटकार हाणले. त्याला रोहित शर्माने 56 धावा करत उत्तम साथ दिली. अखेरच्या ओव्हर्समध्ये सूर्यकुमार यादवने येवून जोरदार फटकेबाजी केली व मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार व मयंक डागरने प्रत्येकी 1 बळी घेतला.

हैदराबादच्या ओपनर्सची धडाकेबाज फलंदाजी : हैदराबादकडून सलामीवीर मयंक अग्रवाल आणि विव्रत शर्माने शानदार फलंदाजी केली. मयंकने 46 चेंडूत 8 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. विव्रत शर्माने 47 चेंडूत 69 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार व 2 षटकार ठोकले. हैदराबादचे इतर फलंदाज काही मोठी खेळी करू शकले नाही. मुंबईकडून आकाश मधवालने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 37 धावा देत 4 गडी बाद केले.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग 11) : मयंक अग्रवाल, विव्रत शर्मा, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक ; इम्पॅक्ट प्लेअर्स - मयंक मार्कंडे, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, अकेल होसेन, अब्दुल समद

मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11) : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल ; इम्पॅक्ट प्लेअर्स - रमणदीप सिंग, विष्णू विनोद. ट्रिस्टन स्टब्स, टिळक वर्मा, संदीप वॉरियर

रोहित शर्मा : आम्ही आधी गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टीचे थोडी कोरडी आहे. तिच्यावर जे काही व्हायचे ते पहिल्या डावात होईल. शोकीनच्या जागी कार्तिकेय आला आहे. आम्हाला फक्त ही मॅच जिंकायची आहे. आम्ही सामना जिकलो तर आम्हाला पुढची संधी मिळेल. मात्र आम्ही फार दूरचा विचार करत नाही. आज काय करायचे याबाबत आम्ही टीम मीटिंगमध्ये बोललो आहे. यापूर्वी देखील आम्ही दुपारची मॅच खेळलो आहे. त्यामुळे आम्हाला येथील खेळपट्टीची आणि परिस्थितीची जाणीव आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त चांगला खेळ करायचा आहे.

एडन मार्करम : आम्हाला हा सिझन विजयाने समाप्त करायचा आहे. संघ आणि काही खेळाडूंना खेळण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. संघात काही बदल आहेत. आमच्यादृष्टीने ते रोमांचक बदल आहेत. हे हाय स्कोअरिंग ग्राउंड आहे. आमच्याकडे गमावण्यासारखे काहीही नसल्यामुळे फलंदाजांसाठी ही चांगली आहे.

हेही वाचा :

  1. IPL 2023 : रोमांचक सामन्यात कोलकाताचा 1 धावांनी पराभव करत लखनौ प्लेऑफ मध्ये
  2. IPL 2023 : चेन्नई पोहचली प्लेऑफमध्ये, दिल्लीचा 77 धावांनी दारुण पराभव, दीपक चहरने घेतले तीन बळी
  3. IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये डु प्लेसिसला पछाडणे कठीण, पर्पल कॅपसाठी चुरस

Last Updated : May 21, 2023, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.