मुंबई : मुंबई इंडियन्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 185-6 धावा केल्या होत्या. मुंबईपुढे विजयासाठी 186 धावांचे लक्ष होते. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने शानदार फलंदाज करत शतक ठोकले. अय्यरने 51 चेंडूत 104 धावांची धडाकेबाज खेळी केली. मुंबईकडून हृतिक शौकीनने दोन विकेट घेतल्या.
मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 - सूर्यकुमार यादव (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शौकीन, पियुष चावला, ड्वेन जॉन्सन, रिले मेरेडिथ.
बदली खेळाडू : रोहित शर्मा, रमणदीप सिंग, अर्शद खान, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेय
कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग 11 : नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीशन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.
बदली खेळाडू : सुयश शर्मा, डेव्हिड विसे, अनुकुल रॉय, मनदीप सिंग, वैभव अरोरा
मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांपैकी एक सामना जिंकून 2 गुण कमावले आहेत. दुसरीकडे, केकेआरच्या संघाने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. यामुळे कोलकाताचा संघ या हंगामात मुंबईपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर कोलकाता नाईट रायडर्सकडून गेल्या 3 सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आपली विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
मुंबईचे सलग दोन पराभव : मुंबई इंडियन्सच्या संघांने या हंगामात सलग दोन पराभव पाहिले आहेत. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा दोन सामने जिंकल्यानंतर सनरायझर्सकडून धक्कादायक पराभव झाला होता. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआर संघाने केवळ 9 सामने जिंकले आहेत, तर मुंबई इंडियन्सच्या संघाने 22 सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे पाहिले तर आयपीएलच्या रेकॉर्डमध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा आहे, पण गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, केकेआरने सलग तीन सामने जिंकले आहेत. कोलकाताचा संघ त्यांची ही विजयाची मालिका पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा : LSG vs PBKS IPL 2023 : पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 2 गडी राखून पराभव, सिकंदर रझाचे अर्धशतक