मुंबई : शुक्रवार, 12 मे 2023 रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या 57 व्या सामन्यात, गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सचा तिस-या क्रमांकाचा संघ, मुंबई इंडियन्सशी सामना झाला. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 191 धावा करता आल्या. रशीद खानने 32 चेंडूत 79 धावा केल्या, ज्यामुळे गुजरातला टायटन्सकडून झालेल्या मानहानीकारक पराभवापासून वाचवले. आणि काहीसा सन्माननीय स्कोअर झाला.
-
.@surya_14kumar set the stage on fire 🔥 🔥 with his maiden IPL TON & bagged the Player of the Match award as @mipaltan beat #GT. 🙌 🙌
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/o61rmJX1rD #TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/1yUb8gX0nW
">.@surya_14kumar set the stage on fire 🔥 🔥 with his maiden IPL TON & bagged the Player of the Match award as @mipaltan beat #GT. 🙌 🙌
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
Scorecard ▶️ https://t.co/o61rmJX1rD #TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/1yUb8gX0nW.@surya_14kumar set the stage on fire 🔥 🔥 with his maiden IPL TON & bagged the Player of the Match award as @mipaltan beat #GT. 🙌 🙌
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
Scorecard ▶️ https://t.co/o61rmJX1rD #TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/1yUb8gX0nW
एमआयची फलंदाजी: इशान किशनने (यष्टीरक्षक) 20 चेंडूत 31 धावा केल्या. रोहित शर्माने (कर्णधार) 18 चेंडूत 29 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूंत 11 चौकार आणि 6 षटकारांसह 103 धावा (नाबाद) केल्या. नेहलने 7 चेंडूत 15 धावा, विष्णू विनोदने 20 चेंडूत 30 धावा, टीम डेव्हिडने 3 चेंडूत 5 धावा आणि ग्रीनने 3 चेंडूत 3 धावा (नाबाद) केल्या. संघाला 2 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सची एकूण धावसंख्या 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा झाली. मुंबई इंडियन्स संघाने आजचा सामना जिंकला त्यामुळे हा संघ राजस्थान रॉयल्सला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर परतला आहे.
जीटीची गोलंदाजी: शमीने 4 षटकात 53 धावा दिल्या. मोहित शर्माने 4 षटकात 43 धावा देत 1 बळी घेतला.रशीद खानने 4 षटकात 30 धावा देत 4 विकेट घेतल्या. नूर अहमदने 4 षटकांत 38 आणि अल्झारी जोसेफने 4 षटकांत 52 धावा दिल्या.
-
For his maiden IPL 5️⃣0️⃣ and a crucial knock, Rashid Khan becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvGT clash #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here is his batting summary 🎥 pic.twitter.com/2ZxWpTKIve
">For his maiden IPL 5️⃣0️⃣ and a crucial knock, Rashid Khan becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvGT clash #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
Here is his batting summary 🎥 pic.twitter.com/2ZxWpTKIveFor his maiden IPL 5️⃣0️⃣ and a crucial knock, Rashid Khan becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvGT clash #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
Here is his batting summary 🎥 pic.twitter.com/2ZxWpTKIve
GT आणि MI कामगिरी: मुंबई इंडियन्सचा विजय लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद सारख्या संघांच्या संकटात भर घालेल. दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, गुजरात टायटन्सने आतापर्यंत 11 सामन्यांत 8 आणि 16 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघ 11 सामन्यांत एकूण 6 विजयांसह केवळ 12 गुण मिळवू शकला आहे. आजचा सामना जिंकला तर तो 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आला.
गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद ; इम्पॅक्ट प्लेअर्स - गिल, सुदर्शन, केएस भरत, शिवम मावी, आर साई किशोर
मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11) : ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय ; इम्पॅक्ट प्लेअर्स - मधवाल, रमणदीप, ब्रेविस, वॉरियर, शोकीन
-
David Miller ✅
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rahul Tewatia ✅@mipaltan get the important breakthroughs 👊#GT are 116/8 after 12 overs
Follow the Match: https://t.co/o61rmJX1rD#TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/ZgomZajvJA
">David Miller ✅
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
Rahul Tewatia ✅@mipaltan get the important breakthroughs 👊#GT are 116/8 after 12 overs
Follow the Match: https://t.co/o61rmJX1rD#TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/ZgomZajvJADavid Miller ✅
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
Rahul Tewatia ✅@mipaltan get the important breakthroughs 👊#GT are 116/8 after 12 overs
Follow the Match: https://t.co/o61rmJX1rD#TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/ZgomZajvJA
हार्दिक पंड्या : आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ही एक चांगली विकेट दिसते मात्र दव प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे धावांचा पाठलाग करणे सोपे राहू शकते. आम्हाला प्रत्येक मॅचचे महत्त्व माहित आहे. आम्हाला फक्त आमच्या योजनांवर ठाम राहून चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे. तुमच्या चूकांतून धडा शिकणे, त्यांना दुरुस्त करणे आणि त्यांची पुनरावृत्ती न करणे महत्त्वाचे आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही हमखास चुका करता. सुदैवाने आमच्या संघात कोणी जखमी नाही. आम्ही त्याच संघासह खळतो आहे.
रोहित शर्मा : आम्हीही आधी गोलंदाजीच केली असती. आम्हाला चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची गरज आहे. गेल्या काही सामन्यांपासून गोष्टी चांगल्या प्रकारे होत आहेत. आम्ही या क्षणी कुठे उभे आहोत हे आम्हाला माहित आहे. फक्त चालू मॅचवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दुखापती आमच्या दृष्टीने चांगल्या नाहीत, परंतु आम्हाला त्याचा सामना करावा लागेल. आम्ही मागील सामन्याप्रमाणे त्याच संघासह खेळत आहोत.
हेही वाचा :
- Yashasvi Jaiswal Records : 21 वर्षांच्या यशस्वीने एकाच सामन्यात मोडले आयपीएलमधील अनेक विक्रम, जाणून घ्या..
- Virat Kohli Instagram Post : राजस्थान विरुद्धच्या मॅचपूर्वी विराट कोहलीने इंस्टाग्रामवर केला 'हा' फोटो शेअर, म्हणाला..
- IPL 2023 : कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी होणार ? दोन्ही संघांना संधी