नवी दिल्ली : 143 धावा झाल्यावर मुंबई इंडियन्सला चौथा मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा 45 चेंडूत 65 धावा करून झेलबाद झाला. मुस्तफिजुर रहमानच्या चेंडूवर यष्टिरक्षक अभिषेक पोरेलने रोहितचा फटका पकडला. मुंबई इंडियन्सला 16व्या षटकात सलग दोन धक्के बसले. दिल्ली कॅपिटल्सचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने वर्मा 16 षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद केला.
-
Mumbai Indians win off the final delivery! 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Another final-over thriller in #TATAIPL 2023! 💥💥#DCvMI https://t.co/2UAkGXvqMG
">Mumbai Indians win off the final delivery! 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023
Another final-over thriller in #TATAIPL 2023! 💥💥#DCvMI https://t.co/2UAkGXvqMGMumbai Indians win off the final delivery! 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023
Another final-over thriller in #TATAIPL 2023! 💥💥#DCvMI https://t.co/2UAkGXvqMG
मनीष पांडेने वैयक्तिक ४१ धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मुकेशने सूर्यकुमार यादवला बाद करत गोल्डन डकवर झेलबाद केले. 15 षटकांनंतर रोहित शर्मा (61) आणि तिलक वर्मा (25) धावा करत मैदानावर उभे होते. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला त्यावेळी 30 चेंडूत 50 धावांची गरज होती.
-
"Smile everybody, smile 😁
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Whether we lose, whether we win, we have to smile"#OneFamily #MumbaiMeriJaan #DCvMI #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @ImRo45 pic.twitter.com/U0mHRa8UKX
">"Smile everybody, smile 😁
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2023
Whether we lose, whether we win, we have to smile"#OneFamily #MumbaiMeriJaan #DCvMI #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @ImRo45 pic.twitter.com/U0mHRa8UKX"Smile everybody, smile 😁
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2023
Whether we lose, whether we win, we have to smile"#OneFamily #MumbaiMeriJaan #DCvMI #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @ImRo45 pic.twitter.com/U0mHRa8UKX
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले.10 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या (73/1) होती. 10 षटकांच्या शेवटी, रोहित शर्मा (48) आणि तिलक वर्मा (11) धावा काढल्या. तेव्हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला 60 चेंडूत 82 धावांची गरज होती.
इशान किशन (31) 8व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 1 धाव चोरून धावबाद झाला. 8 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या (73/1) तर 5 षटकांनंतर धावसंख्या (59/0) होती. मुंबई इंडियन्सच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. 5 षटकांच्या शेवटी, रोहित शर्मा (30) आणि ईशान किशन (28) धावा काढल्या
-
Full throttle mode 🔛 #OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 #DCvMI pic.twitter.com/a9LM6u0otp
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Full throttle mode 🔛 #OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 #DCvMI pic.twitter.com/a9LM6u0otp
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2023Full throttle mode 🔛 #OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 #DCvMI pic.twitter.com/a9LM6u0otp
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2023
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 19.4 षटकांत सर्वबाद 172 धावांवर आटोपला. दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नर (51) आणि अक्षर पटेल (54) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. मुंबई इंडियन्सकडून अनुभवी लेगस्पिनर पियुष चावला आणि वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने ३-३ बळी घेतले. रिले मेरेडिथनेही त्याच्या नावावर 2 विकेट्स घेतल्या. 21:02 एप्रिल 11DC vs MI LIVE: दिल्ली कॅपिटल्सला 19 व्या षटकात 4 धक्के बसले मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने 19व्या षटकातील पहिल्या चेंडूवर झटका दिला.
-
It's time to believe in our tigers at home once again 🔥#QilaKotla awaits yet another exciting contest 💪#YehHaiNayiDilli #IPL2023 #DCvMI @sports_gmr pic.twitter.com/RyjJhNb3gj
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">It's time to believe in our tigers at home once again 🔥#QilaKotla awaits yet another exciting contest 💪#YehHaiNayiDilli #IPL2023 #DCvMI @sports_gmr pic.twitter.com/RyjJhNb3gj
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 11, 2023It's time to believe in our tigers at home once again 🔥#QilaKotla awaits yet another exciting contest 💪#YehHaiNayiDilli #IPL2023 #DCvMI @sports_gmr pic.twitter.com/RyjJhNb3gj
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 11, 2023
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत सर्वबाद 172 धावा केल्या आहेत. मुंबईला आता विजयासाठी 30 चेंडूत आणखी 50 धावांची आवश्यकता आहे. सध्या रोहित शर्मा (61) आणि तिलक वर्मा (25) क्रिजवर आहेत. इशान किशनच्या रुपाने मुंबईला पहिला झटका बसला. तो 31 च्या स्कोरवर रन आऊट झाला.
दिल्लीकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही 51 धावांची खेळी केली. सुरुवातीला झटपट विकेट पडल्यानंतर या जोडीने दिल्लीचा डाव सावरला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि पीयूष चावलाने शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी 3 बळी घेतले.
सलामीवीर पृथ्वी शॉ या सामन्यात देखील अपयशी ठरला. त्याला 15 च्या स्कोरवर हृतिक शौकीनने ग्रीनच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर आलेला मनीष पांडेला 26 च्या स्कोरवर पीयूष चावलाने बेहरेनडॉर्फच्या हातून झेलबाद केले. युवा यश धूलही काही प्रभाव दाखवू शकला नाही. त्याला 2 च्या स्कोरवर रिले मॅरेडिथने बाद केले. रोवमन पॉवेलला पीयूष चावलानेच 4 धावांवर एलबीडब्लू बाद केले.
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, अर्शद खान, हृतिक शौकीन, रिले मॅरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फ, पीयूष चावला ; दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, मुस्तफिझूर रहमान
हेड टू हेड : दिल्लीने या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 3 सामने खेळले असून या तीनही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर मुंबई इंडियन्सने 2 सामने खेळले असून त्यांनाही दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. आज दोन्ही संघांपैकी एकाचे विजयाचे खाते उघडले जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 32 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने 17 सामने जिंकले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 15 सामने जिंकले आहेत.
अरुण जेटली स्टेडियमची आकडेवारी : 2019 पासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 31 T 20 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 23 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. त्याचबरोबर दोन सामने बरोबरीत राहिले आहेत. गेल्या आठवड्यात कॅपिटल्सने येथे गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना खेळला होता तेव्हा त्यांच्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली होती.
हेही वाचा : IPL 2023 : ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यत झाली आणखी रंगतदार, गुणतालिकेत हा संघ अव्वलस्थानी