हैदराबाद : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेज मधील शेवटचा सामना रविवारी (22 मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज ( Sunrisers Hyderabad vs Punjab Kings ) संघात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने हैदराबाद संघावर विजय मिळवला. या सामन्याने लीग स्टेज मधील सामन्यांची सांगता झाली. आता आयपीएल 2022 चा हंगाम शेवटच्या आठवड्यात येवून पोहचला आहे.
-
That's that from Match 70 as @PunjabKingsIPL end their campaign on a winning note. Win by 5 wickets in 15.1 overs.
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/MmucFYpQoU #SRHvPBKS #TATAIPL pic.twitter.com/ujbQsZaUMz
">That's that from Match 70 as @PunjabKingsIPL end their campaign on a winning note. Win by 5 wickets in 15.1 overs.
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
Scorecard - https://t.co/MmucFYpQoU #SRHvPBKS #TATAIPL pic.twitter.com/ujbQsZaUMzThat's that from Match 70 as @PunjabKingsIPL end their campaign on a winning note. Win by 5 wickets in 15.1 overs.
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
Scorecard - https://t.co/MmucFYpQoU #SRHvPBKS #TATAIPL pic.twitter.com/ujbQsZaUMz
आयपीएल 15 व्या हंगामात प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी चार संघाची नावे स्पष्ट झाली आहेत. ज्यामधे अनुक्रमे गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) , राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) , लखनौ सुपरजायंट्स ( Lucknow Super Giants ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघांचा समावेश आहे. या चार संघामध्ये प्लेऑफचे सामने पार पडणार आहेत. ज्यामधे दोन क्वालिफायर, एक एलिमिनेटर आणि एक फायनल सामना यांचा समावेश आहे.
आयपीएल 2022 च्या पॉइंट टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर होता. 14 पैकी 10 सामने जिंकून ते प्रथम प्लेऑफसाठी पात्र ठरले. यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघाने 14 पैकी 9 सामने जिंकून दुसरे स्थान पटकावले. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने 14 पैकी 9 सामने जिंकून तिसरे स्थान पटकावले. दुसरीकडे, आरसीबीने 14 पैकी 8 सामने जिंकले आणि गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले. शेवटी, आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरला.
-
.@mipaltan win 🤝 @RCBTweets reach the Playoffs! 👍 👍 #MIvDC @faf1307 & Co. join @gujarat_titans, @rajasthanroyals & @LucknowIPL in the Top 4⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/sN8zo9RIV4 pic.twitter.com/KqxCb0iJYS
">.@mipaltan win 🤝 @RCBTweets reach the Playoffs! 👍 👍 #MIvDC @faf1307 & Co. join @gujarat_titans, @rajasthanroyals & @LucknowIPL in the Top 4⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2022
Scorecard ▶️ https://t.co/sN8zo9RIV4 pic.twitter.com/KqxCb0iJYS.@mipaltan win 🤝 @RCBTweets reach the Playoffs! 👍 👍 #MIvDC @faf1307 & Co. join @gujarat_titans, @rajasthanroyals & @LucknowIPL in the Top 4⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2022
Scorecard ▶️ https://t.co/sN8zo9RIV4 pic.twitter.com/KqxCb0iJYS
जाणून घ्या प्लेऑफमध्ये कोणाचा सामना कोणत्या संघाशी होणार?
आयपीएल प्लेऑफचे चारही संघ निश्चित झाले आहेत. अशा स्थितीत आता चाहत्यांच्या मनात प्रश्न असेल की, प्लेऑफमध्ये कोणत्या संघाचा कोणाशी सामना होणार? आम्ही तुम्हाला संपूर्ण समीकरणाबद्दल सांगत आहोत. या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 24 मे रोजी होणार आहे. या दोघांपैकी जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचेल.
त्याचबरोबर या मोसमातील एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या 25 मे रोजी होणार आहे. या सामन्यातील पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजेत्या संघाला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत संघाशी क्वालिफायर 2 मध्ये झुंज द्यावी लागेल आणि तो सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत जाईल. पहिला क्वालिफायर 24 मे रोजी आणि एलिमिनेटर सामना 25 रोजी मे कोलकाता येथे होतील. त्याचबरोबर दुसरा क्वालिफायर 27 मे आणि अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाईल.
हेही वाचा -Golden Boy Neeraj Chopra : 'विक्रम मोडण्यात स्वारस्य नाही, पण 90 मीटरपेक्षा जास्त भाला फेकायचाय'