ETV Bharat / sports

IPL Betting : ओडिशात आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, नऊ जणांना अटक - ओडिशा पोलिसांनी नऊ बुकींना अटक

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे सामने दिवसेंदिवस रोमांचक होत असतानाच, यातून पैसे कमावणाऱ्यांचा लोभही वाढत चालला आहे. यातच आता आयपीएल सट्टेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी ओडिशा पोलिसांनी नऊ बुकींना अटक केली ( Odisha police arrest nine bookies ) आहे.

IPL
IPL
author img

By

Published : Apr 18, 2022, 4:25 PM IST

राउरकेला : ओडिशा राज्यातील सुंदरगड जिल्ह्यात आयपीएल सट्टेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ( IPL betting racket exposed ) करण्यात आला आहे. ओडिशा पोलिसांनी रविवारी या रॅकेटमधील नऊ जणांना अटकही ( Odisha police arrest nine bookies ) केली आहे. ओडिशा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 19 ते 28 वयोगटातील संशयित आरोपी छत्तीसगडचे रहिवासी आहेत आणि त्यांनी बिरामित्रपूर ब्लॉकमधील जामुन्नाकी गावात भाड्याने एक छोटेसे घर घेतले होते. स्थानिकांपैकी एकाला त्याच्या हालचालींवर संशय आला. याच संशयाच्या आधारे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्याच्या सांगण्यावरून ओडिशा पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि पकडल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

सुंदरगड जिल्ह्यातील बिरामित्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मानस प्रधान यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या नऊ जणांकडून 18 मोबाईल फोन, दोन लॅपटॉप आणि एक टॅबलेट जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत. यासोबतच अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांच्या परिसरातील पोलीस ठाण्यांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्याने दिले आहेत, जेणेकरुन वेळेत लोकांचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवता येईल.

हेही वाचा - IPL 2022 Updates : कोविडच्या सावटामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ क्वारंटाईन; पुढील सामना होऊ शकतो रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.