हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग 2022 ( IPL 2022 ) मध्ये बऱ्याच खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. त्याचबरोबर काही असे ही खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या खराब प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. परंतु आज आपण मागील हंगामात प्लॉप ठरुन यंदाच्या हंगामात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या तीन खेळाडूंवर प्रकाश टाकणार आहोत. ज्यांनी फक्त प्रदर्शनचं चांगले केले नाही, तर आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
दिनेश कार्तिक ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) -
कार्तिकने या मोसमात चांगली कामगिरी करताना मॅचविनरची भूमिका देखील निभावली आहे. या मोसमातील आपल्या शानदार कामगिरीने त्याने पुन्हा एकदा टीम इंडियासाठी आपली दावेदारी सादर केली आहे. त्याने या हंगामात 10 डावात 61 च्या सरासरीने आणि 189.15 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने 244 धावा केल्या आहेत. गेल्या मोसमात, त्याने केकेआरसाठी 15 डावात 22.30 च्या सरासरीने आणि 131.17 च्या स्ट्राइक रेटने फक्त 223 धावा केल्या होत्या.
लियाम लिव्हिंगस्टोन ( पंजाब किंग्ज ) -
लिव्हिंगस्टोनने या हंगामात पंजाबसाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने या मोसमात आतापर्यंत 10 सामन्यांच्या 10 डावांमध्ये 32.56 च्या सरासरीने आणि 186.62 च्या स्ट्राइक रेटने 293 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याच वेळी, जर आपण त्याच्या शेवटच्या हंगामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 5 सामने खेळले होते. यादरम्यान त्याने पाच डावात 8.40 च्या सरासरीने केवळ 42 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 102.43 होता.
शिमरॉन हेटमायर ( राजस्थान रॉयल्स ) -
शिमरॉन हेटमायरने राजस्थान रॉयल्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे. या हंगामात त्याने 10 डावांमध्ये 65.00 च्या प्रभावी सरासरीने आणि 163.52 च्या स्ट्राइक रेटने 260 धावा केल्या आहेत. दिल्लीसाठी गेल्या मोसमात त्याने 13 डावात 34.57 च्या सरासरीने आणि 168.05 च्या स्ट्राईक रेटने 242 धावा केल्या होत्या.
हेही वाचा - Ipl 2022 Updates : उमरान मलिकने फेकला आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू