मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 30 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर सोमवारी संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson ) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांच्यात सातला नाणेफेक होईल. दोन्ही संघ सध्या आपल्या विजयाच्या शोधात आहेत. कारण दोन्ही संघाला मागील सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
-
When we wear Pink and step onto the field, we do it for something bigger - we do it for you. 💗 #RoyalsFamily | #HallaBol | #RRvKKR pic.twitter.com/3tR0scxY01
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">When we wear Pink and step onto the field, we do it for something bigger - we do it for you. 💗 #RoyalsFamily | #HallaBol | #RRvKKR pic.twitter.com/3tR0scxY01
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 18, 2022When we wear Pink and step onto the field, we do it for something bigger - we do it for you. 💗 #RoyalsFamily | #HallaBol | #RRvKKR pic.twitter.com/3tR0scxY01
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 18, 2022
राजस्थान रॉयल्स संघाला ( Rajasthan Royals Team ) आपल्या मागील सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाला आपल्या मागील दोन सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. राजस्थान रॉयल्स संघ सध्या पाच सामन्यातील तीन विजयासह सहा गुणांनी गुणतालिकेत पाचव्या स्थानी विराजमान आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ( Kolkata Knight Riders Team ) सहा सामन्यात तीन विजयासह सहाव्या स्थानी आहे. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट ( Trent Bolt ) उपलब्ध नव्हता, मात्र आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
-
Time to play the Knight way 💜 #KKRHaiTaiyaar #RRvKKR #IPL2022 pic.twitter.com/9euZeDVv9J
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Time to play the Knight way 💜 #KKRHaiTaiyaar #RRvKKR #IPL2022 pic.twitter.com/9euZeDVv9J
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 18, 2022Time to play the Knight way 💜 #KKRHaiTaiyaar #RRvKKR #IPL2022 pic.twitter.com/9euZeDVv9J
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 18, 2022
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टू हेड - आयपीएलच्या पहिल्या हंगामातील चॅम्पियन राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात 25 सामने खेळले गेले आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे पारडे जड राहिले आहे. कारण 25 सामन्यांपैकी 13 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 11 सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघातील एका सामन्याचा निकाल लागला नाही.
-
Can 7:30 PM come as fast as they do, please? 😅💗#RoyalsFamily | #HallaBol | #RRvKKR pic.twitter.com/OLjOIcxOos
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Can 7:30 PM come as fast as they do, please? 😅💗#RoyalsFamily | #HallaBol | #RRvKKR pic.twitter.com/OLjOIcxOos
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 18, 2022Can 7:30 PM come as fast as they do, please? 😅💗#RoyalsFamily | #HallaBol | #RRvKKR pic.twitter.com/OLjOIcxOos
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 18, 2022
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, प्रशांत कृष्णा, रियान पराग, नॅथन कुल्टर-नाईल, देवदत्त पडिक्कल, नवदीप सैनी, करुण नायर, रेसी व्हॅन ड्यूसेन डर नीशम, अनुनय सिंग, डॅरिल मिशेल, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, ओबेद मॅककॉय, तेजस बारोका आणि केसी करिअप्पा.
कोलकाता नाईट रायडर्स : आरोन फिंच, अभिजित तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टिम साऊथी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज आणि शेल्डन जॅक्सन.
हेही वाचा - IPL Betting : ओडिशात आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, नऊ जणांना अटक