ETV Bharat / sports

IPL 2022 RR vs GT : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये आज चौथ्या विजयासाठी लढत - Indian Premier League

इंडियन प्रीमियर लीगमध्ये ( Indian Premier League ) गुरुवारी अष्टपैलू हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रंजक ठरणार आहे. या सामन्यात दोघांकडे धारदार गोलंदाजी आहे. राजस्थानचे गोलंदाजी आक्रमण या मोसमातील सर्वोत्तम ठरले असून, त्यांचे सर्व फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाज शानदार कामगिरी करत आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

RR vs GT
RR vs GT
author img

By

Published : Apr 14, 2022, 4:26 PM IST

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 24 वा सामना गुरुवारी (14 एप्रिल) खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातवाजता डीवाय पाटील स्टेडियमवर सुरु होईल. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आपला चौथा विजय नोंदवण्यासाठी कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson ) आणि हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली उतरतील.

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघाने आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चार सामने खेळले आहेत. या चार सामन्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे संघाचे सहा गुण आहेत आणि हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्याचबरोबर गुजरात संघाने देखील चार सामन्यापैकी तीन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह पाचव्या स्थानी आहे. या दोन संघातील सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

गुजरात टायटन्सच्या ( Gujarat Titans ) कमी अनुभव असलेल्या फलंदाजांसाठी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीला सामोरे जाणे कठीण आव्हान असेल. हा नवा संघ फलंदाजीत शुबमन गिल ( Shubman Gill ) आणि पंड्या या युवा सलामीवीरांवर जास्त अवलंबून आहे. गिल चांगलाच फॉर्मात आहे, पण झटपट धावा काढण्यासाठी ओळखला जाणारा कर्णधार त्याच्या फलंदाजीत अधिक सावध दिसतो आणि डावाला खोलवर नेण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो.

गुजराज टायटन्सच्या गोलंदाजांनी मात्र सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवात चाणाक्षपणा दाखवला नाही, हा त्यांचा हंगामातील पहिला पराभव होता. ते राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंग लाईन-अप विरुद्ध कसे उभे राहतात हे पाहणे मनोरंजक असणार आहे. ज्यात स्फोटक जोस बटलर ( Jose Butler ), प्रतिभावान देवदत्त पडिक्कल व्यतिरिक्त शिमरॉन हेटमायर आणि सॅमसन यांचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, प्रशांत कृष्णा, रियान पराग, नॅथन कुल्टर-नाईल, देवदत्त पडिक्कल, नवदीप सैनी, करुण नायर, रेसी व्हॅन ड्यूसेन डर नीशम, अनुनय सिंग, डॅरिल मिशेल, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, ओबेद मॅकॉय, तेजस बारोका आणि केसी करिअप्पा.

गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रशीद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, विजय शंकर, जयंत यादव, डॉमिनिक ड्रेक्स, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झार जोफ , प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, वरुण आरोन आणि बिसाई सुदर्शन.

हेही वाचा - MI vs PBKS IPL 2022 : मुंबई इंडियन्सवर पंजाब किंग्जचा 12 धावांनी विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.