ETV Bharat / sports

IPL 2022 RR vs DC : दिल्ली कॅपिटल्स समोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; मागील पराभवाचा बदला दिल्ली घेणार का? - क्रिकेटच्या बातम्या

इंडियन प्रीमियर लीग 2022 ( IPL 2022 ) च्या 15 व्या हंगामात आज म्हणजेच बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने येतील. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर होणार आहे. याआधी जेव्हा हे दोन संघ भिडले होते, तेव्हा संजू सॅमसनच्या टीमने बाजी मारली होती.

RR vs DC
RR vs DC
author img

By

Published : May 11, 2022, 3:29 PM IST

नवी मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील ( Indian Premier League 15th Season ) 58 वा सामना बुधवारी (11 मे)डी. व्हाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या हंगामातील या दोन संघातील दुसरा सामना आहे. पहिला सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी धूळ चारली होती. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने कॅपिटल्स ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे या संघाचे चौदा गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) देखील तितकेच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पाच विजयासह सहा पराभव स्वीकारले आहेत. म्हणून या संघाचे 10 गुण आहेत आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.

दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने ( Spinner Kuldeep Yadav ) विकेट घेतल्या आहेत, मात्र गेल्या दोन सामन्यांत तो चांगलाच महागात पडला आहे. वेगवान गोलंदाज एनरिच नोर्कियाच्या पुनरागमनाने फारसा फरक पडला नाही. कारण तो मागील हंगामातील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. खलील अहमद निश्चितच किफायतशीर होता आणि अक्षर पटेलने चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नरच्या ( Batsman David Warner ) बॅटला धावा मिळाल्या मात्र त्याला सलामीच्या जोडीदारांची मदत मिळाली नाही. दिल्लीने पृथ्वी शॉपासून मनदीप सिंग आणि श्रीकर भारतपर्यंत प्रयत्न केले पण वॉर्नरसाठी योग्य सलामीचा जोडीदार सापडला नाही.

राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे संघ जोस बटलरवर ( RR not depend on jose buttler ) जास्त अवलंबून नाही. यशस्वी जैस्वालने पंजाबविरुद्ध अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल यांना चांगली खेळी खेळावी लागणार आहे. संघाला शिमरॉन हेटमायरची ( Lack of Shimron ) उणीव भासणार आहे, जो आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे गयानाला परतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बर, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी सौव, रोवमन पॉवेल, अॅनरिक नोर्किया, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत आणि टिम सेफर्ट.

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅककॉय, अनुयप सिंग, कुलीन सिंग, करिअप्पा, नवदीप सैनी, ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गरवाल, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि डॅरिल मिशेल.

हेही वाचा - LSG Vs GT: प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ! लखनौचा लाजिरवाणा पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.