ETV Bharat / sports

IPL 2022 MI vs PBKS : पहिल्या विजयाच्या शोधातील मुंबईसमोर आज पंजाबचे आव्हान - Mumbai Indians

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा 23 वा सामना बुधवारी (13 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार असून नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

MI vs PBKS
MI vs PBKS
author img

By

Published : Apr 13, 2022, 3:19 PM IST

पुणे: इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील 23 वा सामना बुधवारी (13 एप्रिल) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर, पुणे येथे खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Mumbai Indians vs Punjab Kings ) संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स संघ या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा संपवण्याच्या उद्देशाने पंजाब सोबत दोन हात करेल.

पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत या हंगामातील चार सामने खेळले आहेत, ज्यापैकी दोन जिंकले, तर दोन सामने गमावले आहेत. दुसरीकडे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) संघाने देखील तितकेच सामने खेळले आहेत. परंतु संघाला एक विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्ज संघ सातव्या स्थानी आहे.

मुंबईचा पुनरागमनाचा मार्ग अतिशय कठीण दिसत आहे, कारण हा संघ प्रत्येक विभागात आतापर्यंत अपयशी ठरला आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला ( Captain Rohit Sharma ) केवळ संघाच्या कामगिरीतच नाही तर स्वत: च्या कामगिरीतही सुधारणा करायला लागेल. रोहित आणि त्याची फ्रँचायझी ज्या नावासाठी ओळखले जाते, त्या प्रकारचा प्रभाव पाडू शकले नाहीत. संघाची मोहीम पुन्हा रुळावर आणायची असेल तर त्याला खुप प्रयत्न करावे लागतील.

पंजाबचा संघ ( Punjab Kings ) गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. रोहित मुंबईसाठी टॉप ऑर्डरमध्ये महत्त्वाचा आहे, पण त्याचे सलामीचे भागीदार इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनाही फलंदाजीत अधिक जबाबदारी घ्यावी लागेल जेणेकरून संघाला उशीर होऊ नये.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हेड टू हेड-

1. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 27 सामने झाले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने 14 सामने जिंकले असून पंजाब किंग्जने 13 सामने जिंकले आहेत.

2. या मोसमातील उभय संघांमधील हा पहिला सामना आहे.

3. मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये, महान फलंदाज रोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक 740 धावा केल्या आहेत.

4. शिखर धवनने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध 26 आयपीएल डावांमध्ये 38.14 च्या सरासरीने 801 धावा केल्या आहेत. त्यात पाच अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने आणखी 24 धावा केल्या तर तो मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थंपी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि इशान किशन.

पंजाब किंग्ज : शिखर धवन, मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, एम शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.

हेही वाचा - IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला सूर गवसला, बंगळुरूवर मिळवला पहिला विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.