ETV Bharat / sports

IPL 2022 Latest Points Table : गुजरातने चेन्नईवर विजय मिळवल्यानंतर 'अशी' आहे गुणतालिका

author img

By

Published : Apr 18, 2022, 7:08 PM IST

आयपीएल 2022 च्या 29 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा तीन विकेट्सने पराभव ( Gujarat Titans won by 3 wkts ) केला. तसेच या दणदणीत विजयासह गुजरातने गुणतालिकेत आपले वर्चस्व कायम राखले आहे.

IPL 2022 PT
IPL 2022 PT

हैदराबाद: आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये, आतापर्यंत दोन नवीन संघांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. यामध्ये सर्व जुन्या संघांवर गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) आणि लखनौ सुपर जायंट्स या नवीन संघांचे वर्चस्व राहिले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पाच सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर, लखनौने सहा सामन्यांत चार सामने जिंकून आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे.

आयपीएल 2022 च्या 29 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा तीन विकेट्सने पराभव केला. या दणदणीत विजयासह गुजरातने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान अजून भक्कम केले आहे. गुजरातने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, ज्यात पाच जिंकले आहेत आणि फक्त एकच सामना गमावला आहे. पाच सामने जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सने 10 गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे.

लखनौ सुपर जायंट्सने ( Lucknow Super Giants ) आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यात चार जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. 4 सामने जिंकल्यानंतर लखनौने 8 गुणांसह दुसरे स्थान गाठले आहे. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादचेही 8-8 गुण आहेत. आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर तर हैदराबादचा संघ चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

आतापर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) आणि मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) कामगिरी सर्वात खराब राहिली आहे. 6 सामने खेळून चेन्नईचा संघ अवघ्या एका विजयानंतर दोन गुणांसह 9व्या स्थानावर पोहोचला आहे. तर, सर्व 6 सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. मुंबईचे विजयाचे खाते अद्याप उघडलेले नाही.

हेही वाचा - IPL 2022 RR vs KKR : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट राइडर्स आज आमने-सामने; दोन्ही संघांना विजयाची गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.