मुंबई - इंडियन प्रीमियर लीगमधील ( IPL 2022 ) 47 वा सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( KKR Vs RR ) यांच्यात हा सामना पार पडणार आहे. कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयश अय्यरने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला ( Kolkata Opt To Bowl ) आहे.
आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये राजस्थान रॉयल्सचे पारडे जड असून, संघ हा दुसऱया स्थानी आहे. राजस्थानने आजतागायत 9 सामने खेळले असून, त्यातील 6 सामन्यांत विजय मिळवत 12 गुण प्राप्त झाले आहेत. तर, अन्य 3 सामन्यांत त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. कोलकाता गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 9 सामने खेळले असून, 3 सामने जिंकले आहेत. तर, 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाताला फक्त 6 गुण मिळाले आहेत. त्यामुळे कोलकाताला यापुढील सामने जिंकावे लागणार आहेत.
कोलकाताचा संघ - एरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर ( कर्णधार ), बाबा इंद्रजिथ ( यष्टीरक्षक ), नितीश राणा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साउथी, श्रीवम मावी.
राजस्थानचा संघ - जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन ( कर्णधार/यष्टीरक्षक ), करुन नायर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन.
हेही वाचा - IPL 2022 SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जचा सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय