नवी मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 22 वा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता डीवाय पाटील स्टेडियमवर नवी मुंबई येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( CSK vs RCB ) संघ आमनेसामने असणार आहेत. सध्या चेन्नई सुपर किंग्स संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ तिसऱ्या स्थानी आहे.
-
Hello and welcome to the DY Patil Stadium for Match 22 of #TATAIPL.@imjadeja's #CSK will take on @faf1307 led #RCB.
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Who are you rooting for ? 💛❤️#CSKvRCB pic.twitter.com/k2667iHBm4
">Hello and welcome to the DY Patil Stadium for Match 22 of #TATAIPL.@imjadeja's #CSK will take on @faf1307 led #RCB.
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
Who are you rooting for ? 💛❤️#CSKvRCB pic.twitter.com/k2667iHBm4Hello and welcome to the DY Patil Stadium for Match 22 of #TATAIPL.@imjadeja's #CSK will take on @faf1307 led #RCB.
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
Who are you rooting for ? 💛❤️#CSKvRCB pic.twitter.com/k2667iHBm4
सलग चार पराभव पत्करल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला ( Chennai Super Kings ) मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) विरुद्धच्या सामन्यात, खेळाच्या सर्व क्षेत्रांत चांगली कामगिरी करून त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवावा लागेल. सलग चार पराभवांमुळे गतविजेत्याचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही मान्य केले आहे.
चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईने रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja ) नेतृत्वाखाली आपल्य नावाप्रमाणे कामगिरी केली. जडेजा आतापर्यं नेतृत्व करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू आणि ड्वेन ब्राव्हो सारख्या वरिष्ठ खेळाडूंना संकटाच्या या परिस्थितीत अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. CSK ने आतापर्यंत एका सामन्यात 200 हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र उर्वरित तीन सामन्यांमध्ये त्यांच्या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. त्यांना आता आरसीबीच्या भक्कम गोलंदाजीचा सामना करावा लागेल, ज्यात फिरकीपटू वानिंदू हसरंगा ( Spinner Vanindu Hasaranga ), डेव्हिड विली आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
-
Navi-gating ➡️🏟️#CSKvRCB #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/omXJuyQJ9k
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Navi-gating ➡️🏟️#CSKvRCB #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/omXJuyQJ9k
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2022Navi-gating ➡️🏟️#CSKvRCB #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/omXJuyQJ9k
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2022
युवा फलंदाज रुतुराज गायकवाडलामोठी खेळी साकाराता आलेली नाही. अष्टपैलू मोईन अली ( All-rounder Moin Ali ) आणि शिवम दुबे यांनाही अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. फ्लेमिंगने कबूल केले की, संघाला वेगवान गोलंदाज दीपक चहरची उणीव आहे, जो दुखापतीमुळे कोणत्याही सामन्यात खेळला नाही. “खेळाडूंची उपलब्धता ही एक समस्या आहे आणि आम्ही आतापर्यंत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे सर्व विभागांमध्ये सुधारणांची गरज आहे.
दुसरीकडे, आरसीबीने आतापर्यंत सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. सलामीवीर अनुज रावतने मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक झळकावले, तर विराट कोहलीनेही धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिस ( Faf du Plessis ) कोणत्याही आक्रमणाला झुगारून देण्यास सक्षम आहे. आरसीबीच्या टॉप ऑर्डरचे तीनही फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
-
Virat and Faf at practice before CSK v RCB
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sweet timing, some big hits, and full of confidence, one minute of pure bliss as Virat Kohli and Faf du Plessis prepared for the CSK game last night.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #CSKvRCB pic.twitter.com/O0SgvMfV4J
">Virat and Faf at practice before CSK v RCB
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 12, 2022
Sweet timing, some big hits, and full of confidence, one minute of pure bliss as Virat Kohli and Faf du Plessis prepared for the CSK game last night.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #CSKvRCB pic.twitter.com/O0SgvMfV4JVirat and Faf at practice before CSK v RCB
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 12, 2022
Sweet timing, some big hits, and full of confidence, one minute of pure bliss as Virat Kohli and Faf du Plessis prepared for the CSK game last night.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #CSKvRCB pic.twitter.com/O0SgvMfV4J
दिनेश कार्तिक आरसीबीसाठी फिनिशरची ( Finisher for Dinesh Karthik RCB ) भूमिका बजावत आहे आणि अभियंता ते क्रिकेटपटू बनलेला शाहबाज अहमदनेही त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. चेन्नईच्या गोलंदाजांमध्ये ब्राव्हो वगळता इतर कोणालाही छाप पाडता आलेली नाही. मुकेश चौधरी त्यांच्यासाठी आतापर्यंत कमकुवत दुवा असल्याचे सिद्ध झाले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा (कर्णधार), मोईन अली, रुतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, मिचेल सँटनर, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, महेश तिक्षना, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम आसिफ, सी हरी निशांत, एन जगदीसन, सुब्रांशू सेनापती, के भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, सिमरजित सिंग आणि मुकेश चौधरी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जॅफेन बेंगलोर, जे. सुयश प्रभुदेसाई, छमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार आणि सिद्धार्थ कौल.