अहमदाबाद - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना रंगला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कोणतेही बदल केलेले नाहीत.
कोलकाता वि. पंजाब हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत २७ सामने झाली आहेत. यातील १८ सामने कोलकाताने जिंकली आहेत. तर ९ सामन्यात पंजाबचा संघ विजयी ठरला आहे.
पंजाब किंग्जचा संघ -
केएल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, मोईजस हेनरिक्स, शाहरूख खान, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवि बिश्र्नोई आणि अर्शदीप सिंग.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू IPL सोडण्याच्या विचारात - सूत्र
हेही वाचा - IPL २०२१ : पॅट कमिन्सचं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान; पीएम केयरला दिली मोठी मदत