ETV Bharat / sports

IPL २०२१ : पंजाब-कोलकात्यामध्ये आज लढत, किंग्जना मुंबईला मागे टाकण्याची संधी - BKS Vs KKR Dream11 Team

आयपीएलच्या चौदाव्या हंगामामध्ये आज साखळी फेरीतील २१वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

IPL 2021 : Punjab Kings vs Kolkata Knight Riders match preview
IPL २०२१ : पंजाब-कोलकात्यामध्ये आज लढत, किंग्जना मुंबईला मागे टाकण्याची संधी
author img

By

Published : Apr 26, 2021, 3:48 PM IST

अहमदाबाद - आयपीएलच्या चौदाव्या हंगामामध्ये आज साखळी फेरीतील २१वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या हंगामात या मैदानावर होणारा हा पहिलाच सामना आहे.

पंजाब किंग्जने मागील सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला सलग चार पराभव स्वीकारावे लागले आहेत. कोलकाता कोणत्याही परिस्थितीत आजच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर पंजाब विजयी लय कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

पंजाब संघाच्या फलंदाजीची मदार राहुल, मयांक अगरवाल आणि ख्रिस गेल या आघाडीच्या फलंदाजांवर आहे. या तिघांव्यतिरिक्त शाहरुख खान हाणामारीच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. यामुळे पंजाबची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. फिरकीपटू रवी बिश्नोईचा समावेश त्यांच्यासाठी फलदायी ठरला.

दुसरीकडे युवा फलंदाज शुबमन गिलला स्पर्धेत अद्याप सूर गवसलेला नाही. यामुळे नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्यावरील दडपण वाढत आहे. कर्णधार मॉर्गनलाही फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स उत्तम अष्टपैलू योगदान देत आहेत. मात्र वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त अन्य गोलंदाजांना बळी मिळवताना संघर्ष करावा लागत आहे.

पंजाब किंग्सचा संघ -

केएल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुड्डा, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, हरप्रीत बरार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, इशान पोरेल, दर्शन नल्कंडे, ख्रिस जोर्डन, डेव्हिड मालन, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोइजेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंह, फॅबियन एलेन आणि सौरभ कुमार.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -

इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, नितीश राणा, टिम सिफर्ट, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोडा, हरभजन सिंह, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.

हेही वाचा - IPL २०२१ : बंगळुरूच्या २ खेळाडूंनी आयपीएलला म्हटलं 'गुडबाय'

हेही वाचा - IPL २०२१ : 'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात', अश्विनची आयपीएलमधून माघार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.