ETV Bharat / sports

IPL २०२१ : मुंबई इंडियन्सपुढे सनरायझर्स हैदराबाद मावळला; १३ धावांनी पराभव - हैदराबाद अंतिम इलेव्हन

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील ९वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने निर्धारित २० षटकात पाच बाद १५० धावा करत हैदराबादसमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ipl 2021 :  mumbai indians vs sunrisers hyderabad match update
LIVE MI VS SRH : रोहित-डी कॉक जोडीकडून आश्वासक सुरूवात
author img

By

Published : Apr 17, 2021, 7:05 PM IST

Updated : Apr 18, 2021, 11:23 AM IST

चेन्नई - कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पुन्हा आज दमदार कामगिरी करून दाखविली आहे. या कामगिरीमुळे आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादला सलग तिसऱ्यांदा पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. सामन्याच्या सुरुवातीला काढलेल्या धावा आणि शेवटच्या सत्रात कायरन पोलार्डने केलेल्या तडाखेबंद फटकेबाजी मुंबईच्या पथ्यावर चांगलीच पडली. मुंबई इंडियन्सने हैदराबादसमोर २० षटकात ५ बाद १५० धावा केल्या होत्या.

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हैदराबाद सनरायझर्स व मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमधील नववा सामना खेळविण्यात आलाआहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने निर्धारित २० षटकात पाच बाद १५० धावा करत हैदराबादसमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवले आहे. पोलार्डच्या फटकेबाजीने मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

मुंबईचा डाव -

मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी डावाची सुरूवात केली. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून देत पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागिदारी केली. विजय शंकरने सलग दोन षटकांत रोहित व सूर्यकुमार यादव या दोन प्रमुख खेळाडूंना माघारी पाठवले. दोन विकेटनंतर मुंबईची धावगती मंदावली व त्यातच क्विंटन डी कॉकही खराब फटका खेळून बाद झाला.

पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकने दोन सुरेख चौकार मारून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर रोहितने चेंडू उंच तडकावत आयपीएलमध्ये सर्वाधिक २१७ षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम आपल्या नावावर केला. विजय शंकरनं त्याच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का देत रोहितला ३२ धावांवर तंबूत धाडले. रोहितने २ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे.

रोहितनंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवनं एक चौकार व एक षटकार खेचून मुंबईची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु विजय शंकरने सूर्यकुमारला २० धावसंख्येवर त्याच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. आदिल राशिदच्या फिरकीचा सामना करताना मुंबईचे फलंदाज चाचपडत होते. त्यानंतर डी कॉक ४० धावांवर बाद झाला. त्याने पाच चौकार लगावले.

पोलार्डने मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. १७व्या षटकात मुजीबच्या पहिल्याच चेंडूवर किरॉन पोलार्डने खणखणीत षटकार खेचला. आयपीएल २०२१मधील तो आतापर्यंतचा सर्वात लांब १०५ मीटरचा षटकार होता. इशान किशनने १२ धावांचे योगदान दिले. १९व्या षटकात पोलार्डचा सोपा झेल विजय शंकरने सोडला. पुढच्याच चेंडूवर हार्दिक पांड्या ७ धावांवर माघारी परतला. पोलार्डनं २२ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३५ धावा करत मुंबईला दीडशे धावांपर्यंत मजल मारून दिली.

मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी

उभय संघात आतापर्यंत १६ सामने झाली आहेत. यात मुंबई आणि हैदराबाद या संघाने प्रत्येकी ८-८ सामने जिंकली आहेत. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघ बरोबरीत आहेत.

मुंबई इंडियन्सचा संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, एडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.

सनरायजर्स हैदराबादचा संघ -

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, अभिषेक शर्मा, विराट सिंह, विजय शंकर, जॉनी बेअरस्टो, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि मुजीब उर रहमान.

हेही वाचा - 'जा गोलंदाजीसाठी परत जा', धोनीने चहरला डीआरएस न घेऊ देता गोलंदाजीसाठी पाठवलं

हेही वाचा - IPL २०२१ : महेंद्रसिंह धोनीने दिला शाहरूखला कानमंत्र, फोटो व्हायरल

Last Updated : Apr 18, 2021, 11:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.