मुंबई - मुंबई इंडियन्सचा स्टार फिरकीपटू राहुल चहर त्याच्या गोलंदाजी इतकाच त्याच्या हेयर स्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याच्या हेयर स्टाईलची भूरळ अनेक चाहत्यांना पडली आहे. प्रत्येक जण त्याच्या हेयर स्टायलिस्ट विषयी जाणून घेण्यास इच्छुक आहे. अशात राहुल चहरने त्याच्या हेयर स्टायलिस्टविषयी माहिती दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
राहुल चहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पाहायला मिळत आहे. राहुलच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ईशानी आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
राहुलने ईशानी सोबतचा फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, भेटा माझ्या हेयर स्टायलिस्टला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, राहुल आणि ईशानी या दोघांनी २०१९ मध्ये साखरपूडा केला आहे. ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चहर ब्रदर्सचा बोलबाला आहे. राहुल चहरने मुंबईकडून खेळताना ३ सामन्यात ८९ धावा देत ७ गडी बाद केले आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे त्याचा चुलत भाऊ दीपक चहर चेन्नई संघासाठी मोलाचे योगदान देत आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : रविंद्र जडेजाचा भरमैदानात डान्स, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - IPL २०२१ : 'बॉल सूखा है घूमेगा', चाणाक्ष धोनीची कमाल आणि राजस्थान पराभव