दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात आज 33 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. उभय संघातील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगला आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाला सामन्याआधीच धक्का -
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याला सुरूवात होण्याआधीच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला. हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला कोरोनाची लागण झाली आहे. तो अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यांच्या संपर्कात आला. यामुळे दोघांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. दोघेही आज सामना खेळणार नाहीत.
दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली. त्यांनी 8 सामन्यात 6 विजय मिळवत एकूण 12 गुणांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाला 7 सामन्यात फक्त 1 विजय मिळवता आला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाची प्लेईंग इलेव्हन -
शिखर धवन, पृथ्वी शा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कगिसो रबादा, आवेश शान आणि एनरिच नार्खिया.
सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेईंग इलेव्हन -
डेविड वार्नर, रिद्धिमान साहा, मनीष पांडे, केन विल्यमसन, केदार जाधव, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि खलील अहमद.
हेही वाचा - IPL 2021: पंजाब किंग्सला अशा पराभवाची सवय झालीय, अनिल कुंबळे संतापले
हेही वाचा - IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजाला कोरोनाची लागण; IPL वर अनिश्चिततचे सावट