दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाबकडून फलंदाजी करताना निकोलस पुरनने अर्धशतक झळकावले. त्याने 28 चेंडूंत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 53 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूंत 3 चौकारांसह 32 धावा केल्या. यापाठोपाठ ख्रिस गेलने चांगली फटकेबाजी केली. गेलने 13 चेंडूंत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा केल्या. तर केएल राहुल आणि दीपक हुडाने प्रत्येकी 15, तसेच नीशमने 10 धावा केल्या. याप्रकारे दिल्लीने दिलेले 165 धावांचे आव्हान पंजाबने 19 षटकांत पूर्ण केले.
दिल्लीकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने 4 षटकांत 27 धावा देत 2 बळी टिपले. यासोबत, अक्षर पटेल आणि आर. आश्विनने प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून पंजाबने गोलंदाजीचा निर्णय घेत दिल्लीला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. दिल्लीने फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून फलंदाजी करताना शिखर धवनने तुफान फलंदाजी करत सलग दुसरे शतक झळकवले. त्याने 61 चेंडूंत 3 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 106 धावा केल्या. तर त्यापाठोपाठ श्रेयस अय्यर आणि ऋिषभ पंत यांनी प्रत्येकी 14 तर शिमरॉन हॅट्मेयर याने 10, मार्कस स्टोईनीस याने 9 आणि पृथ्वी शॉ याने 7 धावा केल्या. याप्रकारे दिल्लीने 8.2च्या सरासरीने 164
पंजाबकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने 4 षटकांत 28 धावा देत 2 बळी घेतले. यासोबत ग्लेन मॅक्सवेलने 1, नीशम याने 1, मुरुगन अश्विनने 1 बळी घेतला.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ॠिषभ पंत, मार्कस स्टोइनीस, शिमरॉन हॅट्मेयर, डॅनियल सॅम, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, तुषार देशपांडे.
पंजाबचा संघ -
केएल राहुल, मयांक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, नीशम, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह.