दुबई - आयपीएलचा अठरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्जसाठी हा सामना महत्त्वाच्या ठरला. या सामन्यात एकही बळी न गमावता चेन्नईने आपली या हंगामातील पराभवाची मालिका खंडित करत पंजाबवर विजय प्राप्त केला. पंजाबने दिलेल्या १७९ धावांचे आव्हान चेन्नईच्या सलामीवीर जोडीने अर्थात फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनने पूर्ण केले. चेन्नईने १७.४ षटकांत नाबाद १८१ धावा केल्या. शेन वॉटसन हा आजच्या सामन्याचा मानकरी ठरला.
पंजाबचा आव्हानाचा पाठलाग करताना एकही विकेट न गमावता चेन्नईने अगदी सहज विजय मिळवला. वॉटसनच्या ५३ चेंडूंत ८३ तर प्लेसिसच्या ५३ चेंडूंत ८७ धावा झाल्या. दोघांच्याही नावावर आजच्या सामन्यात प्रत्येकी ११ चौकार नोंदविले गेले, तर वॉटसनने ३ आणि प्लेसिसने १ षटकार ठोकून विजय चेन्नईच्या खात्यात टाकला.
तत्पूर्वी, या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत धोनीसेनेला १७९ धावांचे आव्हान दिले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईसमोर २० षटकात ४ बाद १७८ धावा केल्या. कर्णधार लोकेश राहुलचे संयमी अर्धशतक आणि निकोलस पूरनच्या फटकेबाजीमुळे पंजाब संघाला आपली धावसंख्या दीडशेपार नेता आली. मयांक आणि राहुलने ६१ धावांची सलामी दिली. मयांक २६ धावांवर बाद झाला. पीयूष चावलाने त्याला करनकरवी झेलबाद केले. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या मनदीप सिंहने झटपट २७ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर राहुल आणि पूरने संघाची धावगती वाढवली. पूरनने १७ चेंडूत ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या. तर, राहुलने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मगतीने ६३ धावा केल्या. राहुल आणि पूरन अठराव्या षटकात बाद झाले. चेन्नईकडून शार्दुल ठाकुरने दोन तर, रवींद्र जडेजा आणि पीयूष चावलाने प्रत्येकी एक बळी घेतला.
दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत २२ सामने झाले असून त्यापैकी १३ सामन्यात चेन्नईने तर ९ सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. दुबईमध्ये रंगणाऱ्या सामन्यासाठी चेन्नईने मागील सामन्यावेळचा संघ कायम राखला आहे. तर, पंजाबने आज हरप्रीत बरार, ख्रिस जॉर्डन आणि मनदीप सिंहला संधी दिली आहे.
LIVE UPDATE :
- वॉटसन ७६ तर, डू प्लेसिस ६३ धावांवर नाबाद.
- चेन्नईला विजयासाठी ३० चेंडूत २९ धावांची गरज.
- पंधरा षटकात चेन्नईच्या बिनबाद १५० धावा.
- चेन्नईला विजयासाठी ५४ चेंडूत ६७ धावांची गरज.
- डु प्लेसिसचे अर्धशतक. खेळीत ७ चौकारांचा समावेश.
- वॉटसनच्या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- शेन वॉटसनचे यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक.
- दहा षटकात चेन्नईच्या बिनबाद १०१ धावा.
- चेन्नईला विजयासाठी ८४ चेंडूत ११९ धावांची गरज.
- सहा षटकापर्यंत वॉटसन २२ तर, प्लेसिस ३२ धावांवर नाबाद.
- पाच षटकानंतर चेन्नईच्या बिनबाद ४१ धावा.
- पहिल्या षटकात चेन्नईच्या बिनबाद ९ धावा.
- शेन वॉटसनकडून डावाचा पहिला चौकार.
- शेल्डन कॉट्रेल टाकतोय पंजाबकडून पहिले षटक.
- चेन्नईचे सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसन मैदानात.
- चेन्नईच्या डावाला सुरुवात.
- २० षटकात पंजाबच्या ४ बाद १७८ धावा.
- सरफराज खान मैदानात.
- पूरनपाठोपाठ राहुल ६३ धावांवर बाद. खेळीत ७ चौकार आणि एक षटकार.
- ग्लेन मॅक्सवेल मैदानात.
- पूरनच्या खेळीत ३ षटकार आणि एक चौकार.
- शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर पूरन ३३ धावांवर झेलबाद.
- १७ षटकानंतर पूरन १६ चेंडूत ३३ धावांवर नाबाद, तर, राहुलच्या ६३ धावा.
- पंधरा षटकानंतर पंजाबच्या २ बाद १३० धावा.
- लोकेश राहुलचे अर्धशतक, खेळीत ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- निकोलस पूरन मैदानात.
- रवींद्र जडेजाने मनदीपला केले बाद.
- मनदीप सिंह झटपट २७ धावा काढून बाद.
- दहा षटकानंतर पंजाबच्या १ बाद ७१ धावा.
- मनदीप सिंह मैदानात.
- पीयुष चावलाने मयांकला केले बाद.
- पंजाबला पहिला धक्का, मयांक २६ धावांवर माघार.
- सात षटकानंतर राहुल ३० तर मयांक २२ धावांवर नाबाद.
- पाच षटकात पंजाबच्या बिनबाद ३८ धावा.
- राहुलकडून पंजाबच्या डावाचा पहिला चौकार.
- पहिल्या षटकात पंजाबच्या बिनबाद ३ धावा.
- दीपक चहर टाकतोय चेन्नईसाठी पहिले षटक.
- पंजाबचे दोन्ही सलामीवीर मैदानात.
- नाणेफेक जिंकून पंजाबचा फलंदाजीचा निर्णय
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग XI -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), अंबाटी रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगिडी, दीपक चहर, पीयूष चावला, सॅम करन.
किंग्ज इलेव्हन पंजाबची प्लेईंग XI -
केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, शेल्डन कॉट्रेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, हरप्रीत बरार, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, रवी बिश्नोई.