मोहाली - आयपीएलच्या बाराव्या मोसमातील नवव्या सामान्यात आज पंजाब-मुंबई भिडणार आहेत. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आय.एस. बिंद्रा मैदान मैदानावर आज संध्याकाळी ४ वाजता हा सामना सुरू होईल. हा सामना युवराज सिंगच्या घरच्या मैदानावर होत असल्याने क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
या मोसमातील पंजाबच्या घरच्या मैदानावर खेळण्यात येणाऱ्या ७ सामन्यांपैकी पहिला सामना मुंबईशी होणार आहे. मागच्या सामन्यात पंजाबने राजस्थानला पराभवाचा धक्का दिला होता. मुंबईच्या संघाला पंजाबच्या ख्रिस गेलपासून सावधान रहावे लागणार आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकुळ घातला आहे. गेल व्यतिरीक्त लोकेश राहुल, सॅम कुरन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि कर्णधार रविचंद्रन अश्विन यांच्याकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.
भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेला मुंबई इंडियन्स संघात युवराज सिंग, क्विंटन डीकॉक, किरॉन पोलार्ड, इशान किशन, यासांरखे चांगले फलंदाज आहेत. या खेळाडूंमध्ये आपल्या खेळीच्या जोरावर कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटवण्याची ताकद आहे. मुंबईच्या गोलंदाजीची कमान ही हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा यांच्यावर असेल. मुंबईचा संघ या मोसमातील एक संतुलित संघ म्हणून ओळखला जातो.
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंड, राहुल चहर, अनुकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डीकॉक, एव्हिन लेविस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनाघन, ऍडम मिलने, जेसन बेरेन्डॉन्फ, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत, बरिंदर स्त्रान, पंकज जयस्वाल, रसीख सलाम, युवराज सिंग, जयंत यादव.
किंग्ज इलेव्हन पंजाब - रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, मयांक अगरवाल, अंकित राजपूत, करुण नायर, मंदिप सिंग, ख्रिस गेल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेविड मिलर, मोजेस हेन्रीक, निकोलास पूरन, वरुण चक्रवर्थी , सॅम करन, मोहम्मद शमी, सर्फराज खान , हार्डस विलजोन, अर्शदीप सिंग, दर्शन नालकांडे, प्रभसिमरन सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन.