चेन्नई - इंडियन प्रीमिअर लीगच्या आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब भिडणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर हा सामना होत असल्याने यजमान चेन्नईचे विजयपथावर परतण्याचे लक्ष्य असेल.
आर. अश्विनचा किंग्स इलेव्हन पंजाब संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तेही आज गुणतालिकेतील आपली आकडेवारी चांगली ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. ड्वेन ब्राव्होची दुखापतग्रस्त झाला असल्याने त्याची चेन्नईसाठी मोठी चिंता आहे. पुढील जवळपास दोन आठवडे तो खेळणार नसल्याने चेन्नईच्या संघात त्याची उणीव जाणवू शकते.
संघ असे-
चेन्नई सुपर किंग्स - शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायुडू, सुरेश रैना, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, स्टॉट कुगेलेजन, दीपक चहर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर
किंग्स इलेव्हन पंजाब - आर अश्विन, लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, सर्फराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, सॅम कुरन, अँड्य्रू टाय, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी