भारताने हा विजय मिळवल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांची कमाई केली. मयंक अग्रवालने पहिल्या डावात झुंजार शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकवले होते. मयंक आजचा सामन्याचा सामनावीर ठरला आहे. तर रविचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
न्यूझीलंडची दुसऱ्या डावातही डळमळीत खेळी
पहिल्या कसोटीत दमदार सुरूवात करणाऱ्या न्यूझीलंडच्या सलामी फलंदाजांना दुसऱ्या सामन्यात सपशेल अपयश मिळाले. दुसऱ्या डावात टॉम लॅथम केवळ 6 धावावर बाद झाला तर विल यंग 20 धावा काढू शकला. त्यानंतर आलेल्या रॉस टेलरलाही 6 धावावर माघारी परतावे लागले. या तिघांनाही अश्विनने बाद केले. मधल्या फळीतील फलंदाज डॅरिल मिशेलने पिचवर टिकून राहण्याचा काही काळ प्रयत्न केला. त्याला हेन्री निकोल्सची साथ मिळाली. दोघांनी संघाची धावसंख्या 100 पार केली. मात्र अक्सर पटेलने मिशेलला यादवच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. 2 षटकार आणि 7 चौकारांसह 60 धावाची खेळी मिशेलने केली. 129 धावात 5 खेळाडू बाद झाल्यानंतर आज कसोटीच्या चौथ्या दिवसाची सुरूवात रचिन रविंद्र केली. मात्र तो 18 धावा केल्यानंतर बाद झाला. त्यानंतर उर्वरीत चार फलंदाज केवळ पाच धावा करु शकले. अशा प्रकारे न्यूझीलंडचा दुसरा डाव सामना सुरू झाल्यानंतर केवळ 43 मिनीटात 167 धावात आटोपला. भारताच्या वतीने रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले.
भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
भारताने यापूर्वी तीन दोन विजय संपादन केले होते. यामध्ये दक्षिण आफ्रिकेला 2015 मध्ये 337 धावांनी पराभूत केले होते. तर न्यूझीलंडला 2016 मध्ये 321 धावांनी धूळ चारली होती. त्यानंतर 2021 मध्ये भारताने तब्बल 372 धावांनी विजय मिळून इतिहास रचला आहे.
भारताचा दुसरा डाव
भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांना सलामीला पाठवून केली. पहिल्या डावात पुजारा सलामीला खेळला नव्हता. त्याच्या जागी शुबमन गिलने भारताची सुरुवात केली होती. शुभमन गिलला पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना उजव्या कोपराला जबर मार लागला. तो पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्यामुळेच तो सलमीला फलंदाजीसाठी उतरला नाही. दुसऱ्या डावातही मयंक अग्रवालची बॅट तळपली. मयंकने नाबाद 38 धावा केल्या तर चेतेश्वर पुजारा 29 धावावर नाबाद राहिला. भारताने दुसऱ्या डावाची मजबूत पायाभरणी केली असून नाबाद 69 धावा दुसऱ्या डावात झाल्या आहेत. भारताने आता 332 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग बऱ्यापैकी सुकर झाला आहे असे मानले जात आहे.
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला न्यूझीलंडचा पहिला डाव
न्यूझीलंड संघाच्या सलामीच्या फलंदाजीसाठी विल यंग आणि टॉम लेथम उतरले. मात्र फार काळ दोघांनाही मैदानावर टिकून राहाता आले नाही. दोघांनाही मोहम्मद सिराजसमोर शरणागती पत्करली. लेथम 10 आणि यंग 4 धावावर माघारी परतले. त्यानंतर डेरी मिशेल 8 धावा, रॉस टेलर 1 धाव, हेन्री निकोलस 7 धावा, रचिन रविंद्र 4 धावा काढून तंबूत परतले. त्यानंतर टॉम ब्लन्डेल 8 धावावर तर टीम सौदी खाते न उघडता माघरी परतले. केल जेमीसनने अखेरच्या क्षणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु 17 धावावर त्याला अक्सर पटेलने माघारी धाडले. विल सोमर्विलेला आर अश्विनने खातेही उघडू दिले नाही. अशा तऱ्हेने न्यूझीलंड संघाचा डाव केवळ 62 धावावर आटोपला. यामुळे भारताला 263 धावांची आघाडी मिळाली आहे.
मोहम्मद सिराजने 3 गडी बाद केले, आर अश्विननेही 4 गडी बाद केले, तर अक्सर पटेलने 2 जयंत यादवने 1 गडी बाद केला.भारताचा पहिला डावभारताने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात 221 पासून पुढे सुरू केली. काल पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताचे 4 फलंदाज बाद झाले होते. वृध्दिमान साहाने केवळ 2 धावांची आज भर घातली व 27 धावावर तो माघारी परतला. मयंक अग्रवालने पुन्हा दमदार खेळी करीत 150 धावा केल्या. त्यानंतर अक्सर पटेलने मैदानावर टिकून राहात 52 धावांची नेत्रदीपक कामगिरी बजावली. आर अश्विनला आपले खाते उघडता आले नाही. जयंत यादव 12 धावा व सिराजने 4 धावा काढल्या. उमेश यादव धाव न काढता नाबाद राहिला. अशा तऱ्हेने भारताने आपला पहिला डाव 325 धावावर ओटोपला.
एका डावात १० बळी घेणारा तिसरा खेळाडू ठरला एजाज
कुंबळे आणि एजाज व्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता. कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे यांनी पाकिस्तानविरुद्ध आणि लेकर यांनी देखील घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.