ETV Bharat / sports

IND vs NZ: भारत न्यूझीलंड दुसरा टी 20 सामना आज, टीम इंडियाला मालिका विजयाची संधी - Second T20 cricket match

भारत आणि न्यूझिलंड (India and New Zealand) यांच्यातील दुसरा टी 20 क्रिकेट सामना (Second T20 cricket match) आज रांचीमध्ये खेळला जाणार आहे. जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने गडी राखून सन्मानजनक विजय संपादन केला होता. तीन सामन्यांच्या या टी 20 मालिकेत जिंकण्याची संधी (Team India a chance to win the series) आता भारतीय संघाकडे आहे.

भारत न्यूझीलंड दुसरा टी 20 सामना आज
भारत न्यूझीलंड दुसरा टी 20 सामना आज
author img

By

Published : Nov 19, 2021, 5:19 PM IST

भारत आणि न्यूझिलंड (India and New Zealand) यांच्यातील दुसरा टी 20 क्रिकेट सामना (Second T20 cricket match) आज रांचीमध्ये खेळला जाणार आहे. जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने गडी राखून सन्मानजनक विजय संपादन केला होता. तीन सामन्यांच्या या टी 20 मालिकेत जिंकण्याची संधी (Team India a chance to win the series) आता भारतीय संघाकडे आहे. आजचा सामना भारताने जिंकला तर मालिका जिंकण्याचा बहुमान भारताला मिळेल. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रवीड (Rahul Dravid) यांच्या शानदार कारकिर्दीची सुरूवात यामुळे अधोरेखीत होऊ शकेल.

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या आक्रमक फलंदाजीने सर्वजण सुखावले होते. हीच अपेक्षा आजही बाळगली जात आहे. मागील सामन्यात विराट कोहलीच्या जागी फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने संधीचा चांगला फायदा घेत ६२ धावांची खेळी केली होती. त्याच्याकडूनही आज अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

आज कर्णधार रोहित शर्मा, अक्षर पटेलच्या जागी युझवेंद्र चहलला संधी देणार का हे पाहावे लागेल. व्यंकटेश अय्यर हा अष्टपैलू खेळाडू संघात आहे. मात्र मागच्या सामन्यात त्याला गोलंदाजीच देऊ न केल्यामुळे रोहितवर टीकाही झाली होती. आज ही त्रूटी तो दूर करणार का हेदेखील पाहावे लागेल.

भारताचा संभाव्य संघ पुढील प्रमाणे असेल -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज

हेही वाचा - मिस्टर 360 : एबी डिव्हिलियर्सची Iplमधून निवृत्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.