मुंबई - न्यूझीलंड विरुद्च्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात अनेक मोठ्या नावांचा समावेश नाही. नव्याने जाहीर झालेल्या संघात अनेक तरुणांना स्थान देण्यात आले आहे. विराट कोहली टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपदावरून पायउतार झाल्याने रोहित शर्माला टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून निवडले आहे. विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आले असून हार्दिक पांड्याला संघाबाहेर केले आहे.
टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
न्यूझीलंडचा 17 नोव्हेंबरपासून भारत दौरा सुरू होणार आहे. विराट कोहली टी-20 विश्वचषकानंतर भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झालाय. ज्यामुळं रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. या दौऱ्यात व्यंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल यांना संधी देण्यात आलीय. याचबरोबर भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलचं संघात पुनारागमन झालंय.
पुणेकर असलेल्या आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळाले आहे. ऋतुराज गायकवाडची आयपीएल २०२१ स्पर्धेत बॅट चांगलीच तळपली होती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला आहे. दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 17 नोव्हेंबर, जयपूर.
दुसरा सामना, शुक्रवार 19 नोव्हेंबर, रांची.
तिसरा सामना, रविवार, 21 नोव्हेंब, कोलकाता.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.