नवी दिल्ली : रणजी ट्रॉफी 2022-23 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आता या स्पर्धेत फक्त तीन सामने खेळायचे आहेत. यातील दोन उपांत्य फेरीचे सामने 8 फेब्रुवारीपासून तर अंतिम स्पर्धा 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दिल्लीचा टॉप ऑर्डर बॅट्समन ध्रुव शौरी याने रणजी ट्रॉफीच्या या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. यासोबतच केरळचा फिरकी गोलंदाज जलज सक्सेना विकेट घेण्यात आघाडीवर आहे. त्यानंतरही या दोन्ही खेळाडूंच्या संघांना ग्रुप स्टेजनंतरच रणजी ट्रॉफीतून बाहेर पडावे लागले.
ध्रुव शौरीने केल्या सर्वाधिक धावा : रणजी ट्रॉफीच्या मोसमात आतापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे. मुंबईने आसामविरुद्ध 4 गडी गमावून 687 धावा करून डाव घोषित केला होता. बडोद्याने नागालँडचा एक डाव आणि ३४३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. याशिवाय दिल्लीच्या ध्रुव शौरीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. ध्रुव शौरीने 7 सामन्यांच्या 12 डावात शानदार फलंदाजी करताना 859 धावा केल्या आहेत. यासह ध्रुवची फलंदाजी सरासरी ९५.४४ झाली आहे. त्याचवेळी पृथ्वी शॉने मुंबईकडून आसामविरुद्ध ३८३ चेंडूत ३७९ धावांची धडाकेबाज खेळी केली.
शतके झळकावण्याचा विक्रम : राजस्थानच्या दीपक हुडाने दोन सामने आणि तीन डावात फलंदाजी करताना 191 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हिमाचल प्रदेशचा सलामीवीर प्रशांत चोप्राच्या नावावर आहे. त्याने 7 सामन्यांच्या 11 डावात 5 शतके झळकावली आहेत. केरळचा फिरकी गोलंदाज जलज सक्सेनाने 7 सामन्यांच्या 13 डावात 50 विकेट घेतल्या आहेत. सक्सेनाची गोलंदाजीची सरासरी १९.२६ आहे. मणिपूरच्या 16 वर्षीय फिरोइझम जोतीनने सिक्कीमविरुद्ध 69 धावांत 9 विकेट घेतल्या आहेत. फिरोइझम जोतीनने एका डावात सर्वोत्तम गोलंदाजीचा किताब पटकावला आहे.
दिल्लीच्या संघाला बसला होता मोठा फटका : यश धुल आजारी पडल्याने दिल्लीच्या संघाला मोठा फटका बसला होता. आजारी असल्याने दिल्लीचा कर्णधार धूल हा कट्टर प्रतिस्पर्धी मुंबईविरुद्धच्या ब गटातील लढतीतून बाहेर पडला होता. दिल्लीच्या संघाकडून कर्णधार यश धुलच्या अनुपस्थितीत उपकर्णधार हिंमत सिंग हा दिल्लीचे नेतृत्त्व करत आहे. तर माजी कर्णधार नितीश राणा याला ऐनवेळी संभाव्य पर्याय म्हणून परत बोलावण्यात आले होते. दिल्ली विरुद्ध मुंबई ही लढत नेहमीच रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात महत्त्वाची असते. पण दिल्ली संघ पाचव्या स्ट्रिंग बॉलिंग आक्रमणासह यंदाच्या सामन्यात खेळत आहे. अनुभवी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ मैदानात उतरला आहे. पाच सामन्यांमध्ये कर्णधार धूल याने 189 धावा केल्या होत्या. डावाची सुरुवात करण्यासाठी संघ व्यवस्थापनाकडून वारंवार त्याला विनंती करण्यात येत होती. मात्र संघाच्या विनंतीला त्याने नकार दिल्याने प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान बदलण्यात आले होते.