वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ सज्ज झालाय. याच सामन्यात भारत नव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. (New Jersey of the Indian team) ही जर्सी नव्वदीच्या दशकाची आठवण करून देणारी आहे. नुकतंच या जर्सी सह भारताचा ऑल राउंड रविंद्र जाडेजा यांना आपला फोटो स्वतःचा ट्विटर हँडल वर शेअर केला आहे. त्याच बरोबर त्यानं ' 90 च्या दशकाला आठवणीत ठेवून '. असं कॅप्शन लिहलं आहे. भारतानं इंग्लंडला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता भारताचा सामना इंग्लंडमध्ये कीवी संघाशी अर्थात न्यूझीलंड सोबत 18 ते 22 जून या दरम्यान होणार आहे.
सामना ड्रॉ झाला तर विश्व विजेता कोण?
जर सामना ड्रॉ किंवा टाई झाला; तर भारत आणि न्युझीलँड या दोघांनाही संयुक्त रुपानं विजेता घोषित केले जाईल अशी माहिती आइसीसीद्वारे देण्यात आली आहे. जर पाऊस अथवा अन्य कारणाने सामना बाधित झाला तर आइसीसीने 23 जून तारीख सामन्यासाठी रिझर्व ठेवली आहे. भारतीय संघ 2 तारखेला इंग्लंडकडे रवाना होईल.
भारतीय संघात कोण कोण सामील आहे?
रोहित शर्मा
शुभमन गिल
मयंक अग्रवाल
चेतेश्वर पुजारा
विराट कोहली ( कर्णधार)
अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार)
हनुमा विहारी
ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
आर अश्विन
रविंद्र जडेजा
अक्षर पटेल
वॉशिंगटन सुंदर
जसप्रीत बुमराह
ईशांत शर्मा
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
शार्दुल ठाकुर
उमेश यादव
केएल राहुल
ऋद्धिमान साहा
केएस भरत
हेही वाचा - विराट कोहलीचा नवा लूक व्हायरल; काही म्हणाले कबीर सिंग तर काही म्हणतात बॉबी देओल