दुबई: आशिया कप 2022 ( Asia Cup 2022 ) साठी भारतीय संघ सध्या यूएईमध्ये आहे. संघाने येथे पहिले दोन सामने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. भारतीय संघ सुपर 4 मध्ये पोहोचला ( Indian team reached Super 4 ) आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह सर्व खेळाडू सध्या ब्रेकचा आनंद घेत आहेत. तसेच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. ब्रेकचा आनंद घेतानाचा भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ ( Indian Cricket Team Players Video ) समोर आला आहे.
-
When #TeamIndia hit 𝗨.𝗡.𝗪.𝗜.𝗡.𝗗! 👏
— BCCI (@BCCI) September 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Time for some surf, sand & beach volley! 😎#AsiaCup2022 pic.twitter.com/cm3znX7Ll4
">When #TeamIndia hit 𝗨.𝗡.𝗪.𝗜.𝗡.𝗗! 👏
— BCCI (@BCCI) September 2, 2022
Time for some surf, sand & beach volley! 😎#AsiaCup2022 pic.twitter.com/cm3znX7Ll4When #TeamIndia hit 𝗨.𝗡.𝗪.𝗜.𝗡.𝗗! 👏
— BCCI (@BCCI) September 2, 2022
Time for some surf, sand & beach volley! 😎#AsiaCup2022 pic.twitter.com/cm3znX7Ll4
भारतीय खेळाडूंनी गुरुवारी दुबईच्या बीचवर खूप मजा केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) एक व्हिडिओ शेअर केला ( Video shared by BCCI ) आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत इतर खेळाडूही समुद्रात फिरताना दिसले. यादरम्यान वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ( Fast bowler Arshdeep Singh ) आपली बॉडी दाखवताना दिसला. या ब्रेक टाईमचा फायदा घेत भारतीय खेळाडू समुद्रात आणि त्याच्या काठावर मस्ती करताना दिसले. भारतीय संघ दुबईतील पाम जुमेराह रिसॉर्टमध्ये थांबला आहे. हे हॉटेल समुद्राच्या काठावर आहे. भारताचा पुढील सामना रविवारी पुन्हा पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.