डब्लिन (आयर्लंड): भारताने दुसऱ्या टी 20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडला 33 धावांनी पराभूत केलं. तीन सामन्यांची मालिका 2-0 ने भारताने खिशात घातली. दरम्यान कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहने पहिली मालिका जिंकली. दुखापत होऊनही चांगली कामगिरी करणाऱ्या जसप्रीतचे आयसीसीने ट्विट करत कौतुक केले. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडच्या संघासमोर 186 धावांचे आव्हान ठेवलं होतं.पंरतु आयर्लंडचा संघ अवघ्या 152 धावांमध्ये गारद झाला. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी या सामन्यात दमदारी कामगिरी केली. या सामन्यात रिंकू सिंहला सामनावीर घोषित करण्यात आलं.
सामनावीर रिंकू : डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आंतराराष्ट्रीय टी20 सामन्यात भारताने आयर्लंडच्या संघाला पराभूत केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला भारतीय डावखुरा फलंदाज रिंकू सिंह! डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी केल्याने निवड समिती आणि व्यवस्थापनाला नक्कीच आनंद झाला असेल. रिंकूने आपल्या फलंदाजीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये जाण्याचा मार्ग सोपा केला. विशेष म्हणजे तो काही दिवसात एकदिवशीय क्रिकेट सामन्यात अशीच फलंदाजी करेल, असा विश्वास त्याने निवड समितीमधील सदस्यांना दिला. रिंकूची 21 चेंडूत 38 धावांची खेळी भारताला विजय मिळवून देणारी ठरली. पहिल्या टी 20 सामन्यात रिंकूची फलंदाजी चांगली झाली नव्हती. परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने चाहत्याना खूष केलं. त्याच्या खेळीमुळे सोशल मीडियावर त्याला नवा फिनिशीर असल्याचं म्हटलं जातयं.
-
An amazing effort from Jasprit Bumrah in just his second match back from injury 😲
— ICC (@ICC) August 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details 👇https://t.co/oUBJCHbkIw
">An amazing effort from Jasprit Bumrah in just his second match back from injury 😲
— ICC (@ICC) August 21, 2023
Details 👇https://t.co/oUBJCHbkIwAn amazing effort from Jasprit Bumrah in just his second match back from injury 😲
— ICC (@ICC) August 21, 2023
Details 👇https://t.co/oUBJCHbkIw
धावांचा डोंगर : आयर्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. याचा फायदा घेत भारतीय संघाने 185 धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक आणि शिवम-रिंकूचा फिनिशिंग टचच्या बळावर भारतानं 20 षटकात 5 गडी गमावून 185 धावा केल्या. यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनने टीम इंडियाचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत 58 धावांची दमदार खेळी केली. तर संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा केल्या. या दोघांनी संघासाठी 71 धावांची दमदार भागिदारी केली. या दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर रिंकू सिंहने 21 चेंडूत 38 धावा केल्या तर शिवम दुबे याने 16 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या.
मालिका विजयाचा 'नारळ' फोडला : भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत आयर्लंड संघासमोर 186 धावांचे आव्हान ठेवलं. या आव्हानाचा बचाव करण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर होती.पहिल्यांदा कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणाऱ्या जसप्रीत बुमराहने व्यवस्थीत गोलंदाजांचा क्रम ठेवत आयर्लंड संघाला अवघ्या 152 धावांवर रोखलं. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कर्णधारपदाचा तणाव न घेता बुमराहनं दमदारी गोलंदाजी केली. पहिल्या सामन्यात त्याने पहिल्या षटकात 2 विकेट मिळवल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यातील 20 व्या षटकात एकही धाव दिली नाही. जसप्रीत बुमराहने चार षटकात फक्त 15 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यात आयर्लंड संघाने 140 धावांचे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ जेव्हा फलंदाजी करण्यास उतरला तेव्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहासमोर विजय मिळवण्याचं आव्हान होतं. यावेळी त्याने त्याच्यातील नेतृत्त्व गुणाची चुणूक दाखवत मालिका जिंकली. कर्णधार म्हणून बुमराहने पहिल्यांदा मालिका जिंकलीय.
आशिया कपसाठी उपकर्णधार होणार : आयर्लंड आणि भारताच्या क्रिकेट संघात तीन टी 20 मालिका होतेय. या मालिकेत भारताने 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केलीय. भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने या मालिकेसाठी कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली होती. बुमराहनं मालिका जिंकून त्याच्यातील नेतृत्व गुण दाखवून दिले. अशात आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची निवड आज सोमवारी होणार आहे. संभाव्य खेळाडूंची नावे आली आहेत. पाकिस्तानच्या धर्तीवर बीसीसीआय 17-18 खेळाडूंची नावेही जाहीर करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान आशिया चषक स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या जागी जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवले जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
एंड्रयू बालबर्नी एकाकी झुंज : 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार पॉल स्टर्लिंग लवकर तंबूत परतला. पण दुसरा सलामी फलंदाज एंड्रयू बालबर्नीने एकाकी झुंज दिली. एकीकडे विकेट पडत असताना बालवर्नीने 72 धावांची खेळी केली. बालबर्नीने 51 चेंडूत चार षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. एंड्रयू बालबर्नी सोडता आयर्लंड संघाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
हेही वाचा-