ETV Bharat / sports

IND vs WI 1st T-20 : नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय; पहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा

भारत आणि वेस्ट इंडिज संघातील पहिल्या टी-20 ( IND vs WI 1st T-20 ) सामन्याला संध्याकाळी आठला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून ( West Indies opt to bowl ) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs WI
IND vs WI
author img

By

Published : Jul 29, 2022, 7:51 PM IST

त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तीन सामन्याच्या टी-20 मालिकेला ( IND vs WI T20 Series ) आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना ब्रायन लारा स्टेडियम त्रिनिदाद येथे खेळला जाणार आहे. सामन्याला संध्याकाळी आठला सुरुवात होणार आहे, तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून ( West Indies opt to bowl ) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले आहे.

या अगोदर भारत आणि वेस्ट इंडिज संघात तीन सामन्याची वनडे मालिका पार पडली आहे. ज्या मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 3-0 ने क्लीन स्वीप दिला. त्यामुळे आज ही भारतीय संघ त्याच निर्धाराने मैदानात उतरण्यास उत्सुक असणार आहे. त्याचबरोबर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा मागील मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज असणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आणि अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शमारह ब्रूक्स, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, निकोलस पूरन (कर्णधार/यष्टीरक्षक), काइल मेयर्स, जेसन होल्डर, अकेल होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय आणि कीमो पॉल.

हेही वााच - Commonwealth Games 2022 : पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियाची 3 विकेट्सनी विजयी सलामी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.