ETV Bharat / sports

IND vs SA 3rd T-20 : तिसऱ्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी विजय - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी विजय मिळवला ( India won by 48 runs ). प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 बाद 179 धावा करताना दक्षिण आफ्रिकेला 180 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 19.1 षटकांत सर्वबाद 131 धावाच करु शकला. परंतु भारतीय संघ मालिकेत 2-1 फरकाने मालिकेत मागे आहे.

IND
IND
author img

By

Published : Jun 14, 2022, 10:56 PM IST

विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना ( IND vs SA 3rd T-20 ) आज डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी विजय मिळवला ( India won by 48 runs ). प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 बाद 179 धावा करताना दक्षिण आफ्रिकेला 180 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 19.1 षटकांत सर्वबाद 131 धावाच करु शकला.

टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. ऋतुराज गायकवाड शानदार खेळी खेळून बाद झाला. त्याने 35 चेंडूत 57 धावांची खेळी ( Ruturaj Gaikwad's half century ) खेळली. ऋतुराजने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. ऋतुराजला केशव महाराजने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. त्याच्याशिवाय इशान किशनने 35 चेंडूत 54 धावा ( Ishan Kishan half century ) केल्या. आपल्या खेळीत ईशानने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. इशानला ड्वेन प्रिटोरियसने रीझा हेंड्रिक्सच्या हाती झेलबाद केले. हार्दिक पांड्याने नाबाद 31 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने ( Bowler Dwayne Pretorius ) सर्वाधिक दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधआर टेम्बा बावुमा 8 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ रीस हेंड्रिक्सनेही वैयक्तिक 23 धावांची खेळी सुरू ठेवली. प्रिटोरियसने काही चांगले फटके मारले पण त्याला चहलने बाद केले केला. रासी व्हॅन डर ड्युसेन आणि डेव्हिड मिलर फ्लॉप ठरले ( David Miller flops ). दोघेही अनुक्रमे 1 आणि 3 धावा करून बाद झाले. अशाप्रकारे धावा काढण्याची संपूर्ण जबाबदारी हेन्रिक क्लासेनच्या खांद्यावर आली. त्यानेही प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. तो 29 धावांची खेळी खेळून बाद झाला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा संघ ( South African team ) शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर 131 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून युझवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal ) 3 आणि हर्षल पटेलने 4 बळी घेतले.

हेही वाचा - IPL Media Rights Auction : आयपीएल मीडिया राइट्समधून बीसीसीआय मालामाल; कमावले तब्बल 48390 कोटी, वाचा संपूर्ण तपशील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.