जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमधील (Johannesburg Wanderers Stadium) दुसऱ्या कसोटी सामन्यात (India vs South Africa 2nd Test) शानदार विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना सात विकेटने जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला, त्यांचा कर्णधार डीन एल्गर. त्याने नाबाद (96) धावांची खेळी केली. आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये भारतीय गोलंदाज प्रभावी ठरले होते. पण चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपली कामगिरी उंचावली व भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही.
-
South Africa beat India for the first time at the Wanderers and keep the series alive 💥
— ICC (@ICC) January 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Dean Elgar leads by example and helps the Proteas level the series 1-1 👏#WTC23 | #SAvIND pic.twitter.com/zqgRP5Cm1x
">South Africa beat India for the first time at the Wanderers and keep the series alive 💥
— ICC (@ICC) January 6, 2022
Dean Elgar leads by example and helps the Proteas level the series 1-1 👏#WTC23 | #SAvIND pic.twitter.com/zqgRP5Cm1xSouth Africa beat India for the first time at the Wanderers and keep the series alive 💥
— ICC (@ICC) January 6, 2022
Dean Elgar leads by example and helps the Proteas level the series 1-1 👏#WTC23 | #SAvIND pic.twitter.com/zqgRP5Cm1x
कर्णधार डीन एल्गरच्या झुंजार आणि नाबाद ९६ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गच्या मैदानावर भारताला ७ गडी राखून मात दिली. सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकेने भारताच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. चौथ्या दिवशी आफ्रिकेला विजयासाठी १२२ धावांची आवश्यकता होती. सुरुवातीची दोन सत्रे पावसामुळे वाया गेली. तिसऱ्या सत्रात ३४ षटकांचा खेळ होणार असल्याची घोषणा करण्यात आली. डीन एल्गर आणि रुसी व्हॅन डर ड्युसेन यांनी फलंदाजीला सुरुवात केली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ड्युसेनला माघारी धाडले, पण त्यानंतर टेम्बा बावुमासोबत एल्गरने भागीदारी रचत विजयावर शिक्कामोर्तब केले. एल्गरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
- धावफलक-
भारत (पहिला डाव) : सर्वबाद २०२ धावा
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : सर्वबाद २२९ धावा
भारत (दुसरा डाव) : ६०.१ षटकांत सर्व बाद २६६ (अजिंक्य रहाणे ५८, चेतेश्वर पुजारा ५३; लुंगी एनगिडी ३/४३, कगिसो रबाडा ३/७७)
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ६७.४ षटकांत ३ बाद २४३ (डीन एल्गर नाबाद ९६, रुसी व्हॅन डर ड्युसेन ४० ; रवीचंद्रन अश्विन १/२६)