ETV Bharat / sports

IND vs PAK Asia Cup 2023 : आफ्रिदी-रौफ जोडीसमोर टीम इंडियाचा टॉप ऑर्डर फ्लॉप - भारत विरुद्ध पाकिस्तान

IND vs PAK Asia Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी खेळला गेलेला सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र सामन्यात पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची पोल खोलली.

IND vs PAK Asia Cup
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 10:31 AM IST

नवी दिल्ली : IND vs PAK Asia Cup : आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी खेळवण्यात आलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं ४८.५ षटकात २६६ धावा केल्या होत्या. मात्र भारताच डाव संपताच पाऊस सुरू झाला, जो नंतर थांबलाच नाही. त्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सोबतचं दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे. पावसामुळे सामना वाहून गेला असला तरी या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची पोल खोलली.

टॉप ऑर्डर कोलमडला : टीम इंडियाचा टॉप ऑर्डर जगात सर्वात मजबूत मानला जातो. मात्र शनिवारी खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये तो पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. केवळ ६६ धावांच्या स्कोअरवर टीम इंडियानं आपल्या ४ विकेट गमावल्या. कर्णधार रोहित शर्मा (११), शुभमन गिल (१०), विराट कोहली (४) आणि श्रेयस अय्यर (१४) धावा करून बाद झाले.

आफ्रिदी-रौफ जोडीसमोर भारतानं नांगी टाकली : पाकिस्तानचे स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला आपल्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडले. शाहीन अफ्रिदीनं ५ व्या षटकात कर्णधार रोहित शर्माला एका शानदार इनस्विंगरवर क्लीन बोल्ड केलं. तेव्हा भारताची धावसंख्या (१५/१) होती. त्यानंतर पुढच्याच षटकात आफ्रिदीने विराट कोहलीला बोल्ड केलं. तेव्हा धावसंख्या (२७/२) झाली. १० व्या षटकात रौफने श्रेयस अय्यरला मिडविकेटवर फखर झमानकरवी झेलबाद केलं. तेव्हा धावसंध्या (४८/३) होती. त्यानंतर रौफनंच १५ व्या षटकात शुभमन गिलला क्लीन बोल्ड केलं. अशाप्रकारे भारताचे आघाडीचे फलंदाज केवळ ६६ धावांत तंबूत परतले.

विश्वचषकापूर्वीची तयारी उघड : आघाडीच्या फळीतील अशा कामगिरीमुळे भारतीय संघाची विश्वचषकापूर्वीची तयारीही उघड झाली आहे. टॉप ऑर्डर फलंदाजी टीम इंडियाची ताकद मानली जाते. मात्र जर त्यांनीच अशी कामगिरी केली, तर भारताचे आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न फक्त स्वप्नच राहील.

हेही वाचा :

  1. Ind Vs Pak Asia Cup : पाकिस्तानचे 'हे' तीन गोलंदाज ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी, जाणून घ्या
  2. Ind Vs Pak Asia Cup २०२३ : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा? जाणून घ्या...
  3. Asia Cup 2023 : आशिया चषकात रोहित शर्माच्या नावे 'हा' अनोखा रेकॉर्ड, धोनी-रणतुंगा सारख्या दिग्गजांनाही मागं टाकलं!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.